gram panchayat election 
जळगाव

दुपारी तीनपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल येणार हाती; अशी असेल मतमोजणी

देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केल्यानंतर उद्या (ता.१८) निकाल जाहीर होणार आहे. निकालाबाबत सर्वच ग्रामपंचायतीत कमालीची उत्सुकता आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून सकाळी दहापासून मतमोजणी सुरू होईल. 

जिल्ह्यात १५ जानेवारीस ७८३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे ६७८ ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात ७८.११ टक्के मतदान झाले होते. सर्वत्रच अतिशय चुरशीच्या लढती झाल्या आहेत. दोन हजार ४१५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी एकूण १३ लाख ११ हजार ८४७ मतदार होते. त्यापैकी दहा लाख २४ हजार ६८३ मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुष पाच लाख ३८ हजार ५९५, तर महिला चार लाख ८६ हजार ५४ एवढ्या मतदारांनी मतदान केले. एकूण ७८.११ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जामनेर तालुक्यात ८२.४५ टक्के, तर सर्वांत कमी मतदान भुसावळ तालुक्यात ६७.९६ टक्के झाले. 

मतमोजणीचे प्रथम प्रात्‍यक्षिक
जिल्ह्यात पंधरा तालुक्यात काही ठिकाणी तहसील कार्यालयात मतमोजणी केंद्र आहेत. तर काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे. सर्वच ठिकाणी आज तहसीलदारांनी मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रात्यक्षिके करून दाखविले. मतमोजणी करावयाची याबाबत मार्गदर्शन केले. 

जळगावला पहिला निकाल शिरसोलीचा 
जळगाव तालुक्याची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी एकूण दहा टेबलावर मतमोजणी होणार आहे. एकावेळी दहा टेबलावर मतमोजणी होईल. एका टेबलावर तीन कर्मचारी असतील. त्यावर पर्यवेक्षक असेल. एकावेळी सर्व टेबलावर एकाच ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. एकूण १८ फेऱ्यात मतमोजणी होईल. सुरवातीस शिरसोली प्रबो, शिरसोली प्रन, म्हसावद, आवार, तुरखेडा, नांद्रा खु खापरखेडा, असोदा, ममूराबाद, कानळदा अशा ग्रामपंचायतीची मतमोजणी हेाईल. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT