sarpanch 
जळगाव

जळगाव जिल्‍ह्‍यात 15 व 17 ला होणार सरपंच निवड

देवीदास वाणी

जळगाव : नुकत्याच निवडणूक झालेल्या तालुक्यातील सर्व 42 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवड 15 व 17 फेब्रुवारी अशा दोन दिवसात होणार आहे.
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक घेण्याच्या निर्णयानुसार 15 जानेवारी रोजी निवडणूक झाली. सरपंच निवडीसाठी 10 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सरपंच निवड करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 5 फेब्रुवारी रोजी यांनी आदेश दिले होते. 8 फेब्रुवारी रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांनी ग्रामपंचायतनिहाय सरपंच, उपसरपंच निवडीविषयी आदेश जारी केले. यात 42 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवड दिनांक तसेच अध्यासी अधिकारी यांची नियुक्तीविषयी नमूद करण्यात आले आहे. नियुक्त अध्यासी अधिकाऱ्यांना उद्या (ता.9) रोजी दुपारी 4 वाजता प्रशिक्षण दिले जाणार आहे.

15 फेब्रुवारीचा सरपंच निवडीच्या ग्रामपंचायत 
शिरसोली प्र.बो., म्हसावद, आसोदा, आवार, कानळदा, कुसुंबा, खु., भादली बु., फुपनगरी, धानवड, भोकर, बोरनार, नांद्रा बु., सावखेडा बु., मोहाडी, रायपूर, जळगाव खु., फुफणी, वडली, वावडदा, शेळगाव-कानसवाडे, मन्यारखेडा, रिधूर, गाढोदा, नांद्रा खु.-खापरखेडा - 

17 फेब्रुवारी ला सरपंच निवडीच्या ग्रामपंचायत
शिरसोली प्र.न., ममुराबाद, तुरखेडा, वडनगरी, उमाळे-देव्हारी, आव्हाणे, कंडारी, कठोरा, लमांजन-वाकडी-कुऱ्हाडदे, पिलखेडा, दापोरा, धानोरा बु.-नागझिरी, चिंचोली, जवखेडे, रामदेववाडी, कडगाव, तरसोद, डिकसाई. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT