accident accident
जळगाव

मित्राला घरी सोडायला लावले; पण घरी पोहचण्याआधीच काळाचा घाला

मित्राला घरी सोडायला लावले; पण घरी पोहचण्याआधीच काळाचा घाला

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : शहरातील शिवकॉलनी थांब्‍याजवळ भरधाव डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात झालेल्‍या अपघातात (Accident) डंपरचे चाक डोक्यावरून गेल्‍याने तरूणाचा जागीच मृत्यू (death) झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. (highway bike accident one death)

शहरातून गेलेल्‍या महामार्गावर झालेल्‍या अपघातात श्याम सुरेश पाटील (वय ३७, रा. निवृत्तीनगर) असे मयत तरूणाने नाव असून दुचाकीस्वार परेश रवींद्र पाटील (वय २९, रा. संभाजीनगर) हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. परेश पाटील व श्याम पाटील दोघेही मित्र असून दूध फेडरेशनमध्ये कामाला होते. मंगळवारी रात्री परेश टॉवर चौकात असताना श्याम पाटील याने ‘मी जैनाबादमध्ये आहे मला घ्यायला ये’ असे सांगून परेशला बोलावून घेतले.

मित्राला घरी जात असताना..

तेथून परेशच्या दुचाकीने (क्र. एम.एच. १९, सी.टी. ०५९१) श्यामला निवृत्तीनगरात घरी सोडण्यासाठी जात असताना रात्री दहाच्या सुमारास शिवकॉलनी थांब्याजवळ भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मागे बसलेला श्याम खाली फेकला गेला. त्यात श्यामच्या डोक्यावरुन टायर गेले तर परेश लांब फेकला गेला. या घटनेत श्यामचा जागीच मृत्यू झाला. तर परेशच्या उजव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच श्यामचा भाऊ अजय, राहुल पाटील, महेश पाटील, हितेश भदाणे घटनास्थळी आले. त्‍यांनी दोघांना जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविले असता डॉक्‍टरांनी श्यामला मृत घोषित केले. तर परेश याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात फरार डंपरचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT