suicide case sakal
जळगाव

एकमेकांचा हात पकडत घेतली पुलावरून उडी; पती- पत्‍नी अन्‌ मुलीचा समावेश

एकमेकांचा हात पकडत घेतली पुलावरून उडी; पती- पत्‍नी अन्‌ मुलीचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : भोद (ता. धरणगाव) येथील रहिवासी असलेल्‍या देसले कुटुंबाने तापी नदीच्या (Tapi river) पुलावरून उडी मारत आत्‍महत्‍या (Suicide) केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली. मुख्य म्‍हणजे नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्‍ताने गेलेले देसले दाम्‍पत्‍य घरी जाण्यासाठी निघाले पण ते थेट पुलावर गेले आणि जीवनयात्रा संपविली. यातील मुलीसह पित्‍याचा मृतदेह सापडला असून महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. (Husband wife suicide with daughter in tapi river)

धरणगाव- एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र रायभान देसले यांनी पत्नी व मुलगी यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील दभाशीजवळील तापीनदीच्‍या पुलावरून उडी घेत जीवनयात्रा संपविली. त्‍यांच्या आत्‍महत्‍येचे कारण समजू शकलेले नाही. देसले यांची कार पुलावर बेवारसपणे उभी असल्‍याने संशय व्यक्‍त केला जात होता. यानंतर शोध घेतला असताना मुलगी आणि वडीलांचा मृतदेह आढळून आला.

घरी जातो म्‍हणून निघाले अन्‌

भोद (ता. धरणगाव) येथील राजेंद्र देसले (वय ५४), पत्नी वंदनाबाई देसले (वय ४८) आणि मुलगी ज्ञानल (वय २१) हे तिघे भरवस (ता. अमळनेर) येथे नातेवाईकांकडून कार्यक्रमानिमित्‍ताने गेले होते. कार्यक्रम संपल्‍यानंतर मुक्‍काम करून दुसऱ्या दिवशी ते घरी जातो म्‍हणून नातेवाईकांकडून कारने (क्र. एमएच १९, पीए १०९४) १७ मे रोजी सकाळी भरवस येथून निघाले. मात्र त्‍यांनी धरणगावकडे येण्याचा रस्‍ता सोडून उलट्या दिशेने प्रवास करण्यास सुरवात केली. यानंतर तापी नदीच्या पुलावर गाडी थांबवून त्‍यांनी आत्‍महत्‍या केली.

गाडी दिसल्‍याने आला संशय

दुपारी साडेतीनच्या सुमारास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले. मात्र ते भोदला पोहचले नाही. यामुळे देसले यांच्या मुलाने नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. मात्र बुधवारी त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. यामुळे संशय आल्‍याने शोधाशोध सुरू केली. दुपारी चार वाजता राजेंद्र देसले यांचा मृतदेह नदीत तरंगतांना दिसून आले. रात्री उशिरा राजेंद्र देसले व त्‍यांच्या मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला. परंतु, राजेंद्र देसले यांच्या पत्नीचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : क्षुल्लक माणसे माझ्या प्रसिद्धीचा आधार घेऊ शकत नाहीत - कंगना रणौत

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT