jalgaon corporation jayshree mahajan
jalgaon corporation jayshree mahajan 
जळगाव

सांगलीसारखाच भाजपचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम जळगावात; शिवसेनेचा डाव चालला, महापौरपदी जयश्री महाजन

राजेश सोनवणे

जळगाव : महापालिकेच्‍या महापौर निवडीच्‍या अनुषंगाने चार दिवसांपासून महापालिकेत राजकिय उलथापालथ झाल्‍या. शिवसेनेची पुरेशी सदस्‍य संख्या नसताना भाजपचे फुटलेले ३१ आणि एमआयएमचे तीन नगरसेवकांच्या मदतीने जळगाव महापालिकेवर भगवा फडकविला. यात महापौर पदी जयश्री महाजन यांची निवड झाली.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत एक वर्षात कायापालट करणार असे आश्‍वासन देत भाजपने एकहाती सत्‍ता मिळविली होती. मात्र या दरम्‍यान भाजपच्याच नगरसेवकांमध्ये फुट पडली. आता महापौर पदासाठीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्‍याने नव्याने महापौर निवड लागली. या निवड प्रक्रियेत भाजपची कसोटी पणाला लागली. या निवड प्रक्रियेत चित्र पालटले आणि भाजपमधील नाराज नगरसेवकांचा गट फुटला आणि शिवसेनेला जावून मिळाला. यामुळे शिवसेनेला सत्‍ता स्‍थापन करणे सहज शक्‍य झाले.

ऑनलाईन निवड प्रक्रिया
महापालिकेच्‍या महापौर निवडीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. पिठासन अधिकारी म्‍हणून जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काम पाहिले. सकाळी अकराला सुरू झालेल्‍या विशेष महासभेत भाजपच्‍या फुटलेल्‍या सर्व नगरसेवकांनी मुंबई, ठाणे येथूनच सभेत सहभाग नोंदवत मतदान केले. 

माजी महापौरांची माघार
महापौर पदासाठी शिवसेनेकडून जयश्री सुनील महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे अर्ज होते. तसेच भाजपकडून महापौरपदासाठी भारती सोनवणे आणि प्रतिभा कापसे आणि उपमहापौर पदासाठी मयुर कापसे आणि सुरेश सोनवणे यांचे अर्ज भरले आहेत. अकराला माघारीची वेळ देण्यात आली होती. यात भाजपच्या माजी महापौर भारती सोनवणे आणि मयुर कापसे यांनी माघार घेतली. महापौर पदासाठी झालेल्‍या निवडणुकीत जयश्री महाजन या विजयी झाल्‍याने त्‍यांना महापौर म्‍हणून घोषीत करण्यात आले. तर उपमहापौर म्‍हणून कुलभूषण पाटील यांची निवड झाली.

पंधरा मतांनी विजय
ऑनलाइन मतदान प्रक्रियेत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना ४५ तर प्रतिभा कापसे यांना ३० मते पडली. यामुळे श्रीमती महाजन या विजयी झाल्‍याचे पिठासन अधिकारी यांनी घोषित केले. तर उपमहापौर म्‍हणून कुलभूषण पाटील विजयी झाल्‍याचे जाहीर केले.

निवडीपुर्वीच शिवसेनेची बॅनरबाजी
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया सभागृहात सुरू असताना शिवसेनेची निवड निश्‍चित मानली जात होती. परंतु अधिकृत घोषणा होण्यापुर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात विजयाचे फलक लावले. मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांच्या निवडीचे भगवा फडकला अशा शब्दात फलक लावले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT