jalgaon corporation 
जळगाव

मास्‍क लावण्याचे सांगणे खटकले; मनपा उपायुक्‍तांच्‍या गाडीवर दगडफेक​

राजेश सोनवणे

जळगाव : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. त्‍यानुसार आज (ता.६) बागवान मोहल्ला परिसरात विना मास्क असलेल्या नागरिक व हॉकर्सवर कारवाई करण्यासाठी मनपा उपायुक्त संतोष वाहूळे गेले होते. दरम्‍यान त्‍यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
जळगाव शहरासह जिल्‍ह्‍यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढू नये याकरीता प्रशासनाकडून नियमावली लावण्यात आली आहे. तरी देखील नागरिकांकडून त्याचे पालन केले जात नाही. यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनासह जिल्‍हा प्रशासन देखील कारवाई करण्यासाठी रस्‍त्‍यावर उतरत आहे.

अन्‌ जमाव चालून आला
शहरातील शनीपेठ, बळीराम पेठ, सुभाष चौक परिसरात उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यासह मनपा अतिक्रमण पथकाकडून कारवाई केली जात आहे. उपायुक्त संतोष संतोष वाहूळे हे सराफ बाजारकडून जोशीपेठकडे जात असताना बागवान गल्लीजवळ काही हॉकर्स व नागरिक विना मास्क असल्याचे निदर्शनास आले. मास्‍क लावण्याबाबत उपायुक्तांनी त्यांना हटकले असता जमाव त्यांच्यावर धावून आला. यावेळी उपायुक्त वाहूळे वाहनात बसून निघत असताना जमावाने वाहनावर दगडफेक केली. यात गाडीच्या मागील काच फुटला आहे. सदर घटनेनंतरची पुढील कारवाई मनपा प्रशासनाकडून करणे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT