jalgaon medical collage road block jalgaon medical collage road block
जळगाव

कोवीड रुग्णालयाबाहेर रूग्णांच्या नातवाईकांचा रस्तारोको; जेवणाचा डबा न देवू दिल्याचे कारण

कोवीड रुग्णालयाबाहेर रूग्णांच्या नातवाईकांचा रस्तारोको; जेवणाचा डबा न देवू दिल्याचे कारण

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्हा कोविड रुग्णालयातील (Jalgaon medical collage) दाखल रुग्णांना दररोज रुग्णांचे नातेवाईक ठरावीक वेळेत भेटून डबा देतात. आज मात्र नातेवाईकांना जिल्हा कोविड रुग्णालयाने (Covid center) नातेवाईकांना डबा देण्यास मनाई केली. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी एकत्र येत रुग्णालयासमोरील रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले. (jalgaon medical collage roadblocks of patients' grandchildren outside covid hospital)

जिल्हा कोवीड रुग्णालय, सीसीसी सेंटर, डीसीएचसी, खासगी कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांना जावू देवू नका. नातेवाईक रुग्णांना भेटतात नंतर बाहेर येवून इतरांना भेटतात यामुळे संसर्ग अधिक फैलावतो. यामुळे रुग्णांना नातेवाईकांना भेटू देवू नका, त्यांनी आणलेला डबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यानी रुग्णांना नेवून द्यावा. त्यांचे फोन किंवा व्हिडीओद्वार बोलण करून द्यावे, अशा सूचना कालच जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी रुग्णालयांना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्हा कोविड रुग्णालयाने आजपासून सुरू केली. सकाळी बारा ते एक अशी रूग्णांना डबा देण्याची वेळ असते. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी डबा देण्यासाठी नेहमीप्रमाणे गर्दी केली. मात्र तयांना आत जावू देण्यास मनाई करण्यात आली.

पीपीई किट घालून जाण्याचीही तयारी

काहींना पीपीई कीट घालून जावू देण्यास सांगितले. पीपीई किटचा दरही अडीचशे वरून पाचशे रूपये करण्यात आला. तरीही नातेवाईकांनी पीपीई किट घेतले. मात्र रुग्णालयाने डबा घेवून जावू दिले नाही. यामुळे गोंधळ निर्माण झाला. रुग्णांनी एकत्र येवून रस्तोरोको आंदोलन केले. पोलिसांना पाचारण केल्याने गोंधळ कमी झाला होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रुग्णांच्या नातेवाइकांना भेटता येणार नाही. त्यांनी डबा आणला असेल तर तो सेवालयात आमच्या कर्मचाऱ्यांना द्यावा. संबंधितांना डबा दिला जाईल. उद्यापासून रुग्ण व नातेवाइृकांशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉल लावून देवू.

- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT