private hospital 
जळगाव

सलाईन लावताना रूग्‍ण ओरडली; म्‍हणून कंपाउंडरने लगावली महिलेच्या कानशिलात

सुरेश महाजन,

जामनेर (जळगाव) : शहरातील पहुर रस्त्यावरील खासगी रूग्‍णालयामध्ये उपचार घेत असलेल्या महिलेला सलाईन लावत असताना खुद्द कंपाउंडरने सदर महिलेच्या कानशिलात लगावली. काही काळात शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये कंपाउंडर विरोधात दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
जामनेर येथील बिस्‍मील्‍लानगर येथील रहिवासी असलेली सुमरीन बी सैय्यद तौफीक ही महिला आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेली होती. दरम्‍यान रविवारी (17 जानेवारी) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास रूग्‍णालयातील कंपाउंडर ज्ञानेश्वर पाटील (रा. शहापूर) हा सदर महिलेला सलाईन लावत होता. 

अन्‌ अचानक कानशिलात मारली
सलाईन लावत असताना फिर्यादी महिला ओरडत होती. महिला आरोड्या असल्‍याने कंपाउंडरने महिलेच्या उजव्या गालावर चपराक मारली. या प्रकारानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रूग्‍णालयात गोंधळ घातला. तसेच हॉस्पिटलसमोर रास्ता रोको केला. यानंतर पोलिसांना बळाचा वापर करून जमाव पांगवावा लागला. सदर प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर पाटील याच्या विरोधात पोलिसात अदाखल पात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज शेख करीत आहे. सदर महिलेला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT