vishal 
जळगाव

हृदयद्रावक..वडिलांऐवजी मुलगा कामावर अन्‌ एकुलत्‍या एक मुलाचा मृत्‍यू ‌

रईस शेख

जळगाव : जळगाव- औरंगाबाद रस्त्यावरील चिंचोली गावफाट्यावर वायरिंगचे काम सुरू असताना ट्रॅक्टरवर इलेक्ट्रिक खांब पडले. वीजप्रवाह सुरू असल्याने १८ वर्षीय युवकाला जबर विजेचा धक्का लागून तो जागीच ठार झाला. वीजप्रवाह सुरू असणे, सुरक्षा उपाययोजना नसणे आणि निष्काळजीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याने इतर कामगारांनी गोंधळ घातला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली. 
नेरी रस्त्यावर जुन्या वीजवाहिनीच्या शेजारीच नवीन वीजवाहिनी उभारण्याचे काम खासगी ठेकेदारातर्फे सुरू आहे. चिंचोली शिवारात राधाकृष्ण लॉन्सजवळ हे काम सुरू आहे. या कामावर भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथील कामगार कार्यरत आहेत. बुधवारी (ता. १०) दुपारी खांब उभे केले जात असताना ट्रॅक्टर उलटून कामावरील मजूर विशाल गायकवाड याचा मुख्य वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. विजेच्या जोरदार धक्क्याने विशाल याच्याशेजारी उभे असलेले ईश्वर शेळके (वय ३५), अक्षय घ्यार (२२) दूरवर फेकले गेले. या घटनेत विशालचा जागीच मृत्यू झाला. विशाल हा त्‍याच्या वडीलांऐवजी विद्युत पोल उभारणीच्या कामाला गेला होता. अक्षय व ईश्वर जखमी झाले. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कंत्राटदाराचा नो रिप्लाय..
दुर्घटनेनंतर कामगारांनी कंत्राटदार सुपडू पाटील यांना घटनेची माहिती कळविली. परंतु, त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने सर्व कामगारांनी कामावरील सुपरवायझर वसंत घ्यार यांच्यावर संताप व्यक्त केला. वीजपुरवठा खंडित न करता हे काम करत असल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप या वेळी कामगारांनी केला. प्रत्यक्षात ठेकेदाराकडून शासकीय कामे करवून घेताना सुरक्षा उपाययोजनांचा वापर होणे बंधनकारक असताना एमएसईबी अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने कामगाराच्या जिवावर बेतली. 

एकुलत्या मुलाचा मृत्यू 
विशाल अविवाहित होता. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्याच्यामागे वडील सोपान ऊर्फ नुकुल गायकवाड, आई छाया असा परिवार आहे. वडील मजुरी करतात. एकुलता एक मुलगा विशालच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime:'थेऊर येथील विवाह सोहळ्यात १४ लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी'; पुणे सोलापूर रोडवरील मंगल कार्यालये बनली चोरीचे अड्डे !

Gadchiroli News : १०० कमांडो, ५०० पोलिस अधिकारी अन् कंत्राटदाराची मेहनत; गडचिरोलीच्या दुर्गम भागात २४ तासांत उभारलं पोलीस मदत केंद्र...

Satara Accident: मुगाव फाट्यावरील अपघातात एक युवक ठार, अन्य जखमी; स्विफ्ट कार व मोटारसायकलचा भीषण धडक

Belgaum Theft : बसप्रवास पडला १८ लाखांचा; गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने चोरले; बेळगावमध्ये खळबळ!

Rupali Chakankar: कोपरगावात गुलाल आपलाच : रुपाली चाकणकर; पालिका निवडणुकीसाठी आमचे येणे केवळ औपचारिकता

SCROLL FOR NEXT