mahavitaran 
जळगाव

दहा महिन्‍यांपासून अडीच लाख नागरीक वापरताय फुकटची वीज

राजेश सोनवणे

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाऊन झाले. या कोरोनाच्या काळात अखंडित व नियमित वीजपुरवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. परंतु, कोरोनाच्या दहा महिन्यांच्या कालावधीत खानदेशातील तब्‍बल २ लाख ६२ हजार ग्राहकांनी फुकटचीच वीज वापरणे पसंत केले. या ग्राहकांकडून एकदा देखील बिलाची रक्‍कम भरण्यात आली असल्‍याने थकबाकी १७० कोटींची झाली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २३ मार्च २० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांकडे जाऊन वीजमीटरचे रीडिंग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्‍यापासून म्‍हणजे एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता. एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांच्या काळात खानदेशातील २ लाख ६२ हजार २६३ घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनी एकही वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे १७० कोटी रुपये थकबाकी आहे. 

जळगावातच सर्वाधिक
दहा महिन्यात बिल भरणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्‍हा आघाडीवर आहे. जळगाव जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार १०४ ग्राहक (९२ कोटी थकबाकी), धुळे जिल्ह्यातील ७६ हजार ८३६ ग्राहक (५६ कोटी) व नंदुरबार जिल्ह्यातील ४४ हजार ३२३ ग्राहकांचा (२२ कोटी थकबाकी) समावेश आहे. 

थकबाकीदारांना मिळणार दिलासा
महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. तरी ग्राहकांनी योजनेचा लाभ घेवून बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT