jalgaon zp 
जळगाव

मार्च एंडिंगची धावपळ..दोन दिवसांत साडेतीनशे कोटींचे बिले अदा 

देवीदास वाणी

जळगाव : जिल्हा कोशागार कार्यालयातून मंगळवारी (ता. ३०) व बुधवारी (ता. ३१) सुमारे साडेतीनशे कोटींची बिले अदा करण्यात आली. ही कार्यालये रात्री बारापर्यंत सुरू होती. 
मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागात मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड, सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र खैरनार यांच्यासह सर्व र्स्टाफ कोरोना नियमांचे पालन करून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील बिलांचे विविध हेडखाली अनुदान आले का, बिलांची रक्कम किती, किती असायला हवी आदींची तपासणी करीत होते. अनुदान येताच एका व्यक्तीला संबंधित बिल घेऊन जिल्हा कोशागार कार्यालयात पाठविले जात होते. इतर कर्मचारी विविध विभागांचे देयकांचे तपशील, किती दिले, किती देणे बाकी, किती अनुदान आले, किती बाकी, बिल कितीचे टाकले आदी कामे करण्यात व्यस्त होती. 

कोशागार विभागाकडून १४८ बिले अदा
जिल्हा कोशागार कार्यालयात जिल्हा कोशागार अधिकारी पी. सी. पंडित, उपकोशागार अधिकारी भीमराव महाले, अपर कोशागार अधिकारी रशीद तडवी यांच्या नियंत्रणाखाली सर्व स्टाफ जिल्ह्यातील शासकीय विभागांना शासनाकडून रिलीज होणाऱ्या अनुदानाचा आढावा घेत संबंधित विभागाचे बिल आले का, याची खातरजमा करून देयके अदा करण्याची कामे करीत होती. मंगळवारी एकूण १४८ बिले कोशागार विभागाने आलेल्या अनुदानानुसार अदा केली. त्याची रक्कम १८७ कोटी ७२ लाख ५८ हजार ४१ एवढी होती. बुधवारी दुपारी दोनपर्यंत ७३ बिले अदा करण्यात आली. त्याची रक्कम चार कोटी ८० लाख ९२ हजार ३४६ रुपये होती. रात्री उशिरापर्यंत अनुदान येणार असल्याने कोशागार कार्यालय रात्री बारापर्यंत सुरू होते. 

अनुदान नाही अन्‌ बिलेही कमी 
दर वर्षी शासनातर्फे मार्चएंडिंगला अधिकाधिक बिलांचे अनुदान मिळते. यामुळे ३१ मार्चचा दिवस बिले कोशागार कार्यालयात टाकण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या असायच्या. मात्र, यंदा अनुदान कमी प्रमाणात आल्याने कोशागार कार्यालयात लांबच्या लांब रांगा दिसल्या नाहीत. 
 
कोरोना काळातही कमी मनुष्यबळावर आम्ही सर्व विभागांचे बिले कोशागार कार्यालयात सादर करण्याचे काम करीत आहोत. काही कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. या मुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अधिकाधिक चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न राहिला. एकूण चारशे बिले आम्ही कोशागार कार्यालयात सादर केली आहेत. 
-विनोद गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद 
 
यंदा अनुदान कमी आल्याने अनेक शासकीय विभागांना बिले टाकता आली नाहीत. ३१ मार्चच्या रात्री उशिरापर्यंत अनुदान येते. ते आले, की आम्ही बिले अदा करतो. कोरोना संसर्गाचे नियम पाळून सर्व कामे सुरू आहेत. 
- पी. सी. पंडित, जिल्हा कोशागार अधिकारी 

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT