woman's stomach 
जळगाव

महिलेच्या पोटात फुटबॉलएवढी गाठ; जिचा आकार होता ३० बाय २० सेमी

सकाळवृत्तसेवा

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागात दोन महिलांच्या अंडाशयाच्या गाठीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात तज्ज्ञ डॉक्टरांना यश आले आहे. 

चोपडा तालुक्यातील रामपूर येथील आदिवासी समाजाच्या शेतमजूर असलेल्या ४० वर्षीय महिलेच्या पोटात दुखत असल्याने सहा महिन्यांपूर्वी खाजगीत सोनोग्राफी करण्यात आली होती. त्यात पोटात अंडाशयाला गाठ असल्याचे दिसून आले होते. मात्र गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना उपचार घेता येत नव्हते. अखेर १८ जानेवारीस त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविले. 

फुटबॉलएवढी गाठ 
स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ व विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी तपासणीअंती शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. १९ तारखेस महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय पथकाला चक्क अंडाशयाला असलेली फुटबॉलच्या आकाराएवढी मोठी गाठ काढण्यात यश आले. त्या गाठीचा आकार ३० बाय २० सें.मी. होता. 

दुसरी शस्त्रसक्रियाही यशस्वी 
दुसऱ्या घटनेत, धरणगाव शहरातील ३८ वर्षीय महिलेच्या तीन सीझर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. या महिलेच्या पोटात दुखत असल्याने १८ जानेवारीस जळगावला आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉ. बनसोडे यांनी महिलेची तपासणी केली असता, तिच्या दोन्ही अंडाशयाला गाठी असल्याचे निदान झाले. तीन सीझर असल्याने शस्त्रक्रिया करणे देखील अवघड होते. तरीही पथकाने जोखीम पत्करत शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

महिलांना डिस्चार्ज 
या दोन्ही महिला रुग्णांची प्रकृती बरी होत असून गुरुवारी २८ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बनसोडे, डॉ. सोनाली मुपडे, डॉ. कांचन चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ.सचिन पाटील, आदींनी परिश्रम घेतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT