valu mafiya 
जळगाव

‘गिरणा’चे माफियांकडून वस्त्रहरण सुरूच; वाळूचे दोन ट्रॅक्टर 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव तालुक्‍यातील मेहुणबारे परिसराला सुजलाम् सुफलाम् करण्यात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या गिरणा नदीपात्राचे वाळूमाफियांकडून वस्त्रहरण सुरूच आहे. गिरणा परिसरात चोरट्या मार्गाने वाळू चोरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाया होत असल्या, तरी वाळूउपसा थांबायला तयार नाही. रात्री दीडच्या सुमारास रहिपुरी (ता. चाळीसगाव) नदीपात्रात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिसांनी जप्त केले. 
अनेक दिवसांपासून वाळू गिरणा पट्ट्यात लिलाव झालेला नाही. बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूची गिरणापात्रातून चोरी करूनही वाळू जास्त भावात विकली जात आहे. मेहुणबारे पोलिस ठाण्यात नवीन आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

पात्रात पोलिसांची धडक 
राहिपुरी (ता. चाळीसगाव) गिरणापात्रात वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती  मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देसले यांना मिळाली. त्यांनी व सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने शनिवारी (ता.२) हवालदार मिलिंद शिंदे, संजय कुमावत, हिलाल पाटील, गोरख चकोर, शैलेश माळी यांनी थेट गिरणापात्रात धडक दिली. पोलिसांना पाहताच चालक व मालक फरारी झाले. यामुळे पुन्हा एकदा कारवाया सुरू झाल्याने वाळूमाफियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

दोन ट्रॅक्टर जप्त 
रहिपुरी (ता. चाळीसगाव) येथील गिरणापात्रात पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर विशाल भिडे, महिंद्र कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली, तर राहुल कदम (दोन्ही रा. रहिपुरी, ता. चाळीसगाव) हे दोन्ही ट्रॅक्टर वाळूने भरलेले आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा करून दंडात्मक कारवाईसाठी चाळीसगाव तहसीलदारांकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मेहुणबारे परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील, तर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवावे. कुणाचीही गय केली जाणार नाही. पोलिसांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे. 
- पवन देसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे, ता. चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Pune News: थरारक जलक्रीडांनी रंगला ‘रिगाटा महोत्सव’; पुण्यात ९८ वर्षांच्या परंपरेचा जलतिमाही उत्सव, नौकांची धमाल!

Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

SCROLL FOR NEXT