gulabrao pati 
जळगाव

शेरोशायरी करणारे मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणतात ‘तेरी मेहरबानीया..’; गायनाला भरभरून दाद

राजेश सोनवणे

जळगाव : राजकीय क्षेत्र असो की अन्‍य कोणते क्षेत्र यात काम करत असताना आपले छंद जोपासणे जमत नाही. पण जिथे संधी मिळेल ती मात्र साधायची असते. असाच अनुभव मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबतीत पाहण्यास मिळाली. भाषणात नेहमी शेरोशायरी करणारे गुलाबराव पाटील सर्वांनाच माहिती आहे. पण एका कार्यक्रमात माईक हाती आला आणि गाणे म्‍हणण्याची संधी मिळाली; ती संधी साधून त्‍यांनी ‘तेरी मेहरबानीया..’ हे गीत गायले.

प्रजासत्ताक दिनानिमित्‍ताने नशिराबाद येथे झालेल्‍या एका कार्यक्रमात राज्‍याचे पाणी पुरवठा व स्‍वच्छता मंत्री तथा जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिंदी चित्रपटातील ‘तेरी मेहरबानीया..’ हे गीत सादर केले. गाणे म्‍हणताना अगदी तालात गायल्‍याने उपस्थितही भारावून गेले आणि त्‍यांच्या गायनाला दादही दिली. मात्र शेरोशायरी करणारे गुलाबराव पाटील यांनी गायलेले गाणे हे एक चर्चेचा विषय ठरले. गुलाबराव पाटील यांच्या गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.

अनेक स्‍टेज गाजवले
गाणे गाण्यापुर्वी गुलाबराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्‍त कताना महाविद्यालयीन जीवनात नाटकात अभिनय केला. पोवाडे सादर करणे, गाणे म्हणणे मला आवडते. यातून मी अनेक स्टेज गाजवले असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT