जळगाव

डेल्‍टा प्‍लस आढळून आलेल्‍या त्‍या रूग्णांचा प्रवास सुरतहून

डेल्‍टा प्‍लस आढळून आलेल्‍या त्‍या रूग्णांचा प्रवास सुरतहून

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्यानंतर त्यातील ४ रुग्ण होमक्वारंटाईन होते. दुसरीकडे यातील काही रुग्णांनी सुरत येथून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने आता लसीकरणावर अधिक भर दिला आहे. (jalgaon-new-variant-delta-plus-patient-travling-surat)

कोरोना तपासणी शिबिरात ६५ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. या रूग्णांचे अहवाल देखील दिल्ली येथे पाठविण्यात आले. काही दिवसांनी आरोग्य विभागाला या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याची सूचना मिळाली होती. या रुग्णांचे हायरिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या ४५ जणांची तपासणी केली असता यात कुणीही बाधित आढळून आले नाही.

सातही रूग्णांमध्‍ये सुधारणा

डेल्‍टा प्‍लसचे आढळून आलेल्‍या सात रुग्णांपैकी ४ रूग्ण हे गृहविलगीकरणात तर ३ रुग्ण हे एका कोविड सेंटरला दाखल होते. मात्र, त्यांची प्रकृती आता सुधारली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिवाय या ठिकाणी शंभर जणांचे लसीकरण करून घेण्यात आले आहे. यांच्‍यातील कोणालाच लक्षण नसल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT