mobile robbery 
जळगाव

शतपावली करणारी महिला होती एकटी; दुचाकीवरून आले दोघे आणि झाली झटापट

रईस शेख

जळगाव : काव्यरत्नावली ते आकाशवाणी दरम्यान अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येवून शतपावली करणाऱ्या विवाहितेच्या हातातून बळजबरी मोबाईल हिसकावून पळ काढल्याची प्रकार रात्री घडला. रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवाजीनगर हुडकोतील रहिवासी विजया सुनिल पवार (वय ३६) काव्यरत्नावली चौकात आल्या होत्या. काव्यरत्नावली चौकात ते आकाशवाणी चौक दरम्यान अॅक्सीस बँकेजवळून पायी जात असतांना २० ते २५ वयोगटातील अज्ञात दोन भामटे दुचाकीवर येवून विवाहितेच्या हातातून मोबाईल बळजबरी हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. महिलेले आरडा ओरड केली मात्र तोपर्यंत दोघे पसार झाले होते. विजया पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहे 

व्हीआयपी ऐरीया असुरक्षीत 
काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी हा संपुर्ण परिसर राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.निकम, न्यायाधीश, जिल्‍हाधिकारी,पोलिस अधीक्षक आणि इतर महत्वाच्या शासकिय अधीकाऱ्यांचा रहिवास असलेला व्हिआयपी परिसर आहे.चोविस तास वरीष्ठासंह पेालिसांचा राबता या मार्गावर असतांना महिलेच्या हातून मोबाईल हिसकावल्याची घटना घडली. याच परिसरात सुसाट दुचाकी पळवणाऱ्या स्टंट बाईकर्सचाही प्रचंड त्रास आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT