cow 
जळगाव

संपुर्ण परिवार करतोय रस्‍त्‍यावरील मोकाट गायींची सेवा; पाणी अन्‌ ढेपची सुविधा 

संजय पाटील

पारोळा (जळगाव) : गेल्या अनेक वर्षापासून सेवा करित असलेला जीवनलाल जोधराज जैन व परिवार यांचे कोरोनाच्या संकट काळात परराज्यातील लोकांना महामार्गालगत अन्नदानाची सेवा करण्याचा अनुभव समाजाचा समोर आला.
महावीरनगर येथील दिनेश जैन व जैन नवयुवक मंडळाने सामाजिक या कठीण काळात बांधिलकी जोपासली. ही नित्यसेवा करित असतांना निराधार गायी ह्या महामार्गलगत येत असत. समाजात गोपुजन पुण्यकर्म मानले जाते. हा सेवाभाव ठेवत जीवनलाल जैन व घरातील पारीवारीक सदस्य आलेल्या गायीस पोळी देत नमस्कार करित होती. कालांतराने हे सेवा कार्य नित्याचे होवु लागल्याने निराधार गायींना पाण्याची व ढेपची सोय जैन परिवाराने करुन पशुसेवा हीच समाजसेवा हे सिध्द करुन दाखविले.

लॉकडाउनमध्येही मदतीचा हात
डिसेंबर महिन्यात कोरोनाचा शिरकाव जगात झाला. २२ मार्च रोजी सर्वत्र ताळेबंदी जाहीर झाली. यामुळे इतर राज्यात नोकरी करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. बऱ्याच जणांना अनेक दिवस पायी तर काहींना सायकलीवर प्रवास करावा लागला. महामार्गालगत महावीरनगर येथील जैन नवयुवक मंडळाने अशा लोकांना अन्नदानाची सोय व इतर सुविधा पुरविण्याची सोय केली. तसेच शहरातील निराधार 150 ते 200 लोकांना रोजच जेवणाची व्यवस्था केली. ही सेवा सतत 5 ते 6 महिने अखंडीतपणे सुरु राहिली.

जैन परिवाराचे सेवेत सातत्य
कठीण काळात अन्नसेवा व इतर गरजु वस्तुंची उपलब्धी करुन देत जैन परिवाराने शहरात समाजसेवेचा वसा तेवत ठेवला. आज निराधार 15  ते 20 गाय व मोठी वासरे यांना पाण्याचा हौद व नित्य सायंकाळी पिठ व ढेप देवुन हा सेवाव्रत अखंडीतपणे ठेवली आहे. जैन परिवाराने सामाजिक बांधिलकीचा सेवायाग अखंडीतपणे सुरु ठेवला आहे. सामाजिक सेवेचे उपक्रम हाती घेत समाजाचे देणे यातुन उतराई करित असल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान जैन परिवार यांचे नित्य गोसेवेचा उपक्रम शहरात नागरिकांना एक प्रेरणा देवुन जात असल्याचे नागरिकात बोलले जात होते.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT