shree ram tempal ayodya 
जळगाव

चिमुकल्‍या रामने दोन वर्ष सांभाळलेला गल्‍ला फोडला अन्‌ रक्‍कम काढून दिली श्रीराम मंदिरासाठी

संजय पाटील

पारोळा (जळगाव) : अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी सर्वत्र समर्पण मदत निधी केंद्र उभारण्यात आले आहेत. प्रत्येक जण धार्मिक कार्यात योगदान यथाशक्तीप्रमाणे देत आहे. या भव्य मंदिर निर्माण कार्यात आपला देखील खारीचा वाटा असावा; या भावनेतून शहरातील डॉ. रविंद्र निकम यांचे सुपुत्र राम निकम यांने आई- वडीलांकडुन मिळालेल्या पैशांची बचत करुन गल्ला तर केला होता. तो कापुन त्यातील 1 हजार 621 रुपये मंदिर बांधकामासाठी कुटुंबियांनी दिल्याने संघाच्या कार्यकर्त्यांनी या चिमुकल्याचे योगदानाचे कौतुक केले.
श्रीराम मंदीराचे आयोध्यानगरीत भव्य महाकाय मंदिर उभारले जात असुन या कार्यात सर्वांचे योगदान असावे या भावनेतुन प्रत्येक तालुक्यात समर्पण निधी केंद्रे आहेत. यातून निधी संकलन करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.

गल्‍ला आणला आणि वडीलांसमोर ठेवला
आजवर अनेक दात्यांनी स्वयंस्फुर्तीने या सेवाकार्यात योगदान दिले आहे. या महाकार्यात आपले देखील योगदान द्यावे अशी चर्चा घरात सुरु असतांना चिमुकल्या रामने दोन वर्ष जिवापाड जपलेला पैशांचा गल्ला वडील डॉ. रविंद्र निकम यांचे पुढे आणला. तो म्हणाला कि, आपण मंदीर निर्माण कार्यात ही रक्कम देवु. हे ऐकुण परिवार अवाक झाला. लहानग्या वयात परमेश्वरी कार्यात एवढी निस्सिम निष्ठा पाहुन संघाचे कार्यकर्त्यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक करित चिमुकल्या जीवाचे योगदान नक्कीच नोंद घेण्यासारखे राहील असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

55 हजार 555 चा धनादेश 
श्रीराम मंदीर निर्माण कार्यात सर्वजण मदत करित असुन या कार्यात किसन हिंदुजा यांचेकडून 55 हजार 555 एवढ्या रकमेचा धनादेश समर्पण समितीच्या प्रतिनिधीकडे देण्यात आला. महेश गृप हा नेहमीच विविध उपक्रमात अग्रेसर असुन आज धार्मिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मान्यवर म्हणाले.

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: हिंगोलीमध्ये पुन्हा बीडसारखी घटना! दोघांनी मिळून एकाला जनावरासारखं मारलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जीएसटी अनुदानात मोठी वाढ; नागपूर महापालिकेच्या तिजोरीला दिलासा

Rishabh Pant: रिषभ पंतची कॅप्टनशिप जाणार? IPL 2026 मध्ये फ्लॉप ठरल्यानंतर LSG मध्ये मोठ्या बदलांचे संकेत!

Nagpur News: ओव्हरटेकच्या प्रयत्नात उभ्या कंटेनरला दोन आयशरची धडक; नागपूर-अमरावती महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प

Nagpur District: सावनेर परिसरात एकाच दिवशी उष्माघाताचे दोन बळी; चार दिवसांत तिसरी घटना; वाढत्या तापमानाने चिंता वाढली, खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

SCROLL FOR NEXT