death
death death
जळगाव

राजकीय वलयातील पिता-पुत्र जोडींच्या ‘एक्झिट’

उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : राजकारणात नेहमीच चांगल्या लोकांची वानवा दिसून येते. काही राजकारणी स्वार्थी राजकारण (politics) करीत स्वतःचे हित जोपासतात. मात्र काही मोजके राजकारणी स्वतःचे पदरमोड करीत समाजकारण करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत असतात. अशीच तालुक्यातील राजकारणातील काही चांगली माणसे आपल्या कुटुंब सदस्यांसह गेल्याने (Corona death) भविष्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (political leader and father son death in corona)

धार (ता. अमळनेर) येथील बाजार समितीचे माजी संचालक हिंमत शिवदास पाटील (वय ५३) यांचे शनिवारी (ता. ८) पहाटे साडेचारला निधन झाले. दोन दिवसांपूर्वी मठगव्हाण (ता. अमळनेर) येथील शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किरण भालेराव पवार (वय ४७) यांचेही निधन झाले. या दोन्ही नेत्यांनी या जीवनातूनच अचानक ‘एक्झिट’ घेतल्याने अमळनेरातील राजकारणाचे फार मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे वडीलही यात गेल्याने अवघे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणुकीत या दोन्हीची एक वेगळीच छाप दिसून यायची म्हणून ते आपापल्या परिसरातील किंगमेकर होते.

तीन आठवड्याचे अंतरात कुटुंबाला धक्‍का

हिंमत पाटील हे एच. एस. बापू म्हणून तालुकावासीयांना परिचित होते. हसतमुख असणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांचा एक चाहता वर्ग तालुक्यात होता. त्यांनी अनेक वर्ष धार गावाचे सरपंचपद भूषविले होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे त्यांनी केली होती. विविध कार्यकारी सोसायटीचे ते माजी अध्यक्ष होते. सद्य:स्थितीमध्ये ते पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथे सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. धार येथील शैक्षणिक संस्थेचे ते सचिव, तसेच नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय काम ते पाहत होते. तीन आठवड्यांपूर्वी त्यांचे वडील शिवदास ओंकार पाटील (वय ७३) यांचे अल्प आजाराने निधन झाले होते. अवघ्या तीन आठवड्यातच वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंमत पाटील यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, भाऊ नातवंडे असा परिवार आहे. ते मयूर पाटील व माध्यमिक शिक्षक प्रमोद पाटील यांचे वडील होत.

अन्‌ गावात शोककळा

किरण पवार हेपण कट्टर शिवसेना कार्यकर्ते होते. त्यांनी गावात उपसरपंचपद भूषविले होते. त्यांची नुकतीच येथील बाजार समितीवर प्रशासकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य होते. त्यांचे वडील निवृत्त पोलिसपाटील भालेराव महादू पवार (वय ६७) यांचे दहा दिवसांपूर्वीच चोपडा येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी त्यांच्या कर्त्या मुलाचाही चोपडा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघा पिता-पुत्राच्या अकाली निधनाने मठगव्हाण गावावर शोककळा पसरली आहे. किरण पवार यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, काका, चूलत भाऊ असा परिवार आहे. ते डॉ. वसंतराव पवार यांचे पुतणे होत.

राजकीय मार्गदर्शक हरपला

सोनखेडी (ता. अमळनेर) येथील प्रगतिशील शेतकरी वामनराव नामदेवराव पाटील (वय ७४) व अध्यापक विद्यालयाचे कर्मचारी प्रदीप वामनराव पाटील (वय ४७) या दोघा-पिता पुत्राचेही अवघ्या महिनाभरात निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वामनराव पाटील हे सोनखेडीचे सरपंच, शेतकी संघाचे माजी संचालक मिलिंद बोरसे यांचे वडील होत. प्रत्येक निवडणुकीत आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनामुळेच यश पदरी पडत होते. मात्र आता राजकारणातील गॉडफादर व खांद्याला खांदा लावून प्रचाराची धुरा सांभाळणारा मोठा भाऊ गेल्याने फार मोठे नुकसान झाल्याचे मिलिंद बोरसे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT