Children's Bravery Award
Children's Bravery Award 
जळगाव

चोपड्याच्या प्रिन्सला राष्‍ट्रपती बालशौर्य पुरस्‍कार; त्‍याच्या शौर्याच्या कथेने अंगावर येतो काटा

सुनील पाटील

चोपडा (जळगाव) : चोपडा येथील प्रिन्स उर्फ प्रणित नितीन पाटील यास राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला असून राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे. राज्यपाल बाल आयोगाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी दूरध्वनी वरून माहिती दिली. तसेच आज (ता. 17) राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल निवड समितीच्या अध्यक्षा गिता सिद्धार्था यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले.
गेल्या वर्षी 5 डिसेंबर 2019 रोजी चोपडा- शिरपूर जुन्या रोडलगत असलेल्या साईविहार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा तरुण- तरुणीने घरात प्रवेश करून मिरचीची पूड असलेला स्प्रे डोळ्यांत मारून लुटमारीचा प्रयत्न केला होता. मात्र, घरात असलेल्या महिलांनी या दोघांशी झटापट करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी 12 वर्षीय प्रणितने चोरट्याचा पाय घट्ट पकडून झुंज दिली होती. यावेळी घरात काम करणाऱ्या महिलेने गॅलरीत जाऊन चोर- चोर आवाज दिल्याने अपार्टमेंटमधील रहिवासी जमा झाले. त्यावेळी दुचाकीवरून पसार होताना दोघांना पकडून चोप दिला. ही घटना दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. 

अशी घडली होती घटना
दिया गॅस एजन्सीच्या संचालिका वैशाली नितीन पाटील यांना आबा घरी आहेत का, असा प्रश्न एका अनोळखी तरुणाने विचारून चौकशी केली. त्यावेळी वैशाली पाटील यांनी कामानिमित्त धुळे येथे गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर तो परत माघारी गेला आणि पाऊण तासानंतर एक मास्क बांधलेली डोळ्यावर काळा चष्मा असलेली तरुणी आली. तिने तुमचे बँक अकाउंट 'एचडीएफसी' बँकेत आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर ती घरात आली आणि सोफ्यावर बसली. तिने बाहेर खूण केल्यानंतर लागलीच तो तरुण घरात आल्याबरोबर त्याने वैशाली पाटील यांच्या डोळ्यांत स्प्रे मारला. यावेळी वैशाली पाटील व दोघांमध्ये झटापट सुरू असताना त्यांचा 12 वर्षांचा मुलगा प्रणीत याने हे पाहिल्याबरोबर संशयितांचे पाय पकडून ठेवले. आईला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी आरोळ्या मारल्या. मात्र, त्या कुणालाच ऐकू येत नव्हत्या. त्यांच्याकडे काम करणारी लताबाई पाटील ही गॅलरीमध्ये भांडी धूत होती. तिला आरोळी ऐकू आल्यानंतर तिने गॅलरीचा दरवाजा बाहेरून बंद करून रस्त्यावर जाणाऱ्यांना चोर-चोर अशी आरोळी मारली. त्यावेळी अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांनी त्यांना पकडले आणि चोप दिला.

प्रणीतने दाखविले होते शौर्य
अनोळखी तरुण- तरुणी घरात येऊन आईच्या डोळ्यांवर स्प्रे मारला व आईचे मंगळसूत्र तोडले. हे प्रणीतच्या लक्षात येताच त्याने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. संशयितांचा पाय घट्ट धरून ठेवला. त्यानेही आरोळ्या मारल्या, हे ऐकून झटापटीत मंगळसूत्र तुटले. यावेळी गिरीश सपकाळेने 'माऊ चल..' असे म्हणत दोन्ही पळून जात होते. मात्र, त्यांना अपार्टमेंटमध्ये खाली पकडण्यात आले. या शौर्यामुळे प्रिन्स उर्फ प्रणित नितीन पाटील यास राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रणित हा अमळनेर येथील बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील व दिया गॅस एजन्सी चे संचालिका वैशाली पाटील यांचा मुलगा आहे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT