gram 
जळगाव

खानदेशात ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी

राजेश सोनवणे

जळगाव : खानदेशात शासकीय हरभरा खरेदीला वेग आला आहे. बाजारातील दरांच्या तुलनेत शासकीय दर अधिक आहेत. शिवाय शासकीय केंद्रात विक्रीसाठी नोंदणीही बऱ्यापैकी झाली होती. यामुळे खानदेशात गेल्या आठ दिवसात सुमारे ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. 
जळगाव जिल्ह्यात १४, धुळ्यात चार, नंदुरबारात सहा हरभरा खरेदी केंद्र सुरू आहेत. यात जळगाव जिल्ह्यात १७ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तर नंदुरबारात सात हजार क्विंटल आणि धुळ्यातही सुमारे सहा हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. खरेदीला या आठवड्यात वेग आला आहे. जळगाव जिल्ह्यात सुरवातीला फक्त १३ खरेदी केंद्र सुरू होते. बोदवड येथील केंद्र बंद होते. पण हे केंद्रदेखील गेल्या आठवड्याच्या अखेरिस सुरू झाले. या केंद्रातही हरभऱ्याची सुमारे दोन हजार क्विंटल आवक झाली आहे. 

दहा शेतकऱ्यांची नोंदणी
जळगाव, चोपडा, रावेर येथील हरभरा खरेदी केंद्रात अधिकची खरेदी झाली आहे. धुळ्यात शिरपूर येथे खरेदीला प्रतिसाद अधिक मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १० हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. हरभरा खरेदीसाठी कोरोनामुळे मर्यादीत संख्येत शेतकऱ्यांना बोलावले जात आहे. जेथे गोदाम निश्चित केले आहे, तेथेच हरभऱ्याची तोलाई केली जाते. यामुळे थेट गोदामात हरभरा मागवून घेतला जात आहे. काही गोदामे शेतकऱ्यांना लांब पडत असल्याने वाहतूक खर्च अधिकचा येत आहे, अशी माहिती मिळाली. बारदानाही  मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खरेदीत अडचणी नाहीत. हरभरा खरेदीची रोजची मर्यादा प्रत्येक केंद्रात कोरोनामुळे निश्चित केली आहे. यामुळे खरेदी लवकर पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT