Corona vaccination center Corona vaccination center
जळगाव

३० वर्षांवरील नागरिकांनाही लसीकरण

लसीकरण केंद्रांवर पुन्हा रांगा; ३० वर्षांवरील नागरिकांनाही लसीकरण

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : शहरात शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणास (Corona vaccination) सुरवात झाली. शहरातील आठही केंद्रांवर शनिवारी सकाळपासूनच लस घेण्यासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. महिन्याभरापासून लशींचा पुरेसा साठा नसल्याने केवळ ४५ वरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जात होता. अनेकांनी लस घेतल्याने सर्वच केंद्रांवर शुकशुकाट होता. आजपासून लस उपलब्ध झाल्याने पुन्हा लसीकरण केंद्रे गजबजू लागली आहेत. (jalgaon-news-Queue-again-at-corona-vaccination-centers)

पूर्वी ऑनलाइन नोंदणीची अट होती. आता आधारकार्ड लसीकरण केंद्रावर (Corona vaccination center) दाखवून नोंदणी होते. नंतर लसीकरण केले जाते. पूर्वीही १८ ते ४४ वयेागटांसाठी केंद्रावर जाण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी लागत होती. यामुळे शहरातील केंद्राचे स्लॉट मिळताच काही मिनिटांत नोंदणी फुल होत असे. आता लशींची उपलब्धता झाल्याने ३० ते ४४ वयोगटांतील लसीकरण सुरू झाले आहे. आजअखेरपर्यंत एकूण पाच लाख ९८ हजार ८३ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे

२८ हजार लसींचा साठा शिल्‍लक

शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन हॉस्पिटल (शिवाजीनगर), कुंभारवाड्यातील शाहीर अमर शेख हॉस्पिटल, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, मनपा शाळा क्रमांक १८, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय या केंद्रांवर कोव्हिशील्ड लसीकरण सुरू झाले. लशींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात कोव्हिशील्ड लशीचा साठा २७ हजार ९७०, तर कोव्हॅक्सिन लशींचा साठा ३६० शिल्लक आहे.

आजपासून कुपन देणार

रेडक्रॉस सोसायटी लसीकरण केंद्र, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयासह इतर केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी झाल्याने रविवार (ता. २०)पासून रेडक्रॉस सोसायटीच्या केंद्रावर सकाळी आठला लसीकरणाचे कुपन देऊन त्यांना वेळ दिली जाईल. त्यावेळेत त्यांनी येऊन लसीकरण करावे, असे आवाहन रेडक्रॉसचे विनोद बियाणी यांनी केले आहे.

शासनाकडून लशीचा पुरवठा होऊन ३० ते ४० वयोगटांतील नागरिकांना लस देण्याच्या सूचना आहेत. यामुळे शहरात लसीकरण सुरू झाले. जसजसा लशींचा पुरवठा होईल. तसतसा जिल्ह्यातील केंद्रांवर या वयोगटांतील नागरिकांना लस दिली जाईल.

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT