valu tractor 
जळगाव

पाठलाग करून पकडले अवैध वाळूचे ट्रॅक्टर 

राजु कवडीवाले

यावल (जळगाव) : तालुक्यातील डांभुर्णी येथे अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या धडक मोहिमेत पकडण्यात आले. महसूल प्रशासनाने आठ दिवसांत केलेल्या पाचव्या कारवाईमुळे विना परवाना वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 
डांभुर्णी गावाजवळच्या नाल्यात साठवण करून ठेवलेली वाळू मंगळवारी (ता. १६) पहाटेच्या सुमारास कोळन्हावी येथील पिंताबर समाधान सोळुंके हा अवैधरीत्या ट्रॅक्टरद्वारे (एमएच १९, सीयू ९८०२) वाहून नेत होता. या वेळी निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, फैजपूर मंडळातील तलाठी पी. पी. जावळे, आमोदे येथील तलाठी एम. पी. खुर्दा, पोलिस कर्मचारी भूषण चव्हाण, चालक हिरामण सावळे यांनी विनापरवाना वाळूची वाहतूक करताना संबंधिताला ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. या विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार पवार यांनी दिली. 

आठ दिवसात पाचवी कारवाई
महसूलच्या वाळूमाफियाविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत आठ दिवसातील पाचवी कारवाई झाल्याने वाळूमाफियांवर चांगलाच वचक बसल्याचे दिसून येत आहे. या वेळी महसूलच्या पथकाने घटनास्थळी जाऊन वाळूचा पंचनामा करून ट्रॅक्टर जमा केले आहे. दरम्यान, वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने कारवाईच्या भीतीने वाहन घेऊन पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, महसूलचे वाहनचालक हिरामण साळवे यांनी समयसुचकता बाळगून वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अत्यंत खडतर मार्गावरून सुमारे पाच किलोमीटर पाठलाग करून वाहनास पकडण्यात यश मिळवले. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT