crime 
जळगाव

जळगाव, कासोद्यात अवैध सावकारांवर छापे 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात अवैध सावकारी जोरात सुरू आहे. सहकार विभागाच्या तीन पथकांनी मंगळवारी (ता. १६) जळगाव व कासोदा (ता. एरंडोल) येथे अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या तीन जणांच्या घरी व दुकानांवर छापे टाकून कारवाई केली आहे. अवैधरीत्या सावकारीबाबत अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. 
सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक व छापा पथकप्रमुख के. पी. पाटील (एरंडोल) यांनी सांगितले, की जळगाव व कासोदा येथे तीन जण अवैधरीत्या सावकारी करतात. त्यांच्या दुकानाची व घराची तपासणी अचानक छापे टाकून केली असता सर्व सत्य बाहेर येईल, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे आली होती. त्यानुसार मंगळवारी सहकार जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी जळगाव येथे एका ठिकाणी, तर कासोदा येथे दोन ठिकाणी सकाळी अकरा व सव्वाअकराच्या सुमारास छापे टाकले. त्यात, सपना बियाणी, शैलेश बियाणी, श्रीराम बियाणी यांच्या जळगाव व कासोदा येथील दुकाने व घरांवर छापे टाकले. त्यात ते अवैधरीत्या सावकारी करताना आढळले. त्यांच्याकडून सावकारी व्यवहाराची अनेक कागदपत्रे, फायली जप्त करण्यात आल्या आहेत. कासोदा येथील पथकात सहाय्यक निबंधक व छापा पथकप्रमुख के. पी. पाटील व सहाय्यक निबंधक जी. एच. पाटील (अमळनेर) यांच्यावर छाप्याची जबाबदारी होती. दोन्ही पथकांत सहकार विभागाचे चार-चार अधिकारी व स्वतंत्र पोलिस बंदोबस्त होता. सहकार विभागाने गेल्या वर्षभरात अशी धडक कारवाई पहिल्यांदा केल्याने अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अशी कारवाईची मोहीम सहकार विभागाने वर्षभर सातत्याने केल्यास अनेक अवैध सावकार समोर येतील. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT