जळगाव

त्रासले अन्‌ रस्‍त्‍यावरील डबक्‍यात जावून बसले

त्रासले अन्‌ रस्‍त्‍यावरील डबक्‍यात जावून बसले

सकाळ डिजिटल टीम

यावल (जळगाव) : तालुक्यातील साकळी गावापासून ते फाट्यादरम्यान रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबत असल्याने ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यावी. या मागणीसाठी निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ, साकळी येथील सामाजीक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे यांनी समर्थक कार्यकार्त्यांसह मेन रस्त्याच्या खड्डयात साचलेल्या पाण्यात बसून आज आंदोलन केले. (jalgaon-news-sakri-villageroad-damage-and-people-strike-road)

मुख्य रस्ता पाण्याखाली येत असून मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी तसेच उर्दू शाळेच्या मुलांना देखील हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी साकळी येथील सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे यांनी संबधित अधिकारी व प्रशासन यांना निवेदन दिले होते. तरी सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.

अखेर खड्ड्यातील पाण्यात बसले

दखल घेतली जात नसल्‍याने आज साकळी गाव ते साकळी फाट्या दरम्यान मेन रस्त्यावरील साचलेल्‍या पाणीच्या खड्यात बसून निद्रावस्थेत असलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले. आंदोलनाला गावातील उर्दू शाळा शिक्षक पालक, तसेच रिक्षा चालक– मालक व स्थानिक ग्रामस्थ यांनी पाठींबा दिला. यात विजय जंजाळे, आकाश जंजाळे, उर्दू शाळेचे शिक्षक फैसलखान, रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष अकबर शेख फरीद खान, सैय्यद अजगर सैय्यद अझहर, लाला डायव्हर आदींचा आंदोलनात सहभाग घेतला.

बांधकाम विभागाकडून लेखी आश्‍वासन

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग यावलचे अधिकारी अजीत निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या अडचणी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून आंदोलनकर्त्यांना रस्त्याच्या बाजूस असलेल्या अपुर्ण गटारींच्या कामाबाबत लक्ष देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच ग्राम पंचायत प्रशासनास तत्त्काळ अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा देऊन अतिक्रमण काढावे. जेणे करून पाणी साचणार नाही असे आदेश दिले. त्या खड्यावर मुरूम टाकून सध्या स्थितीत रस्ता दुरुस्त करून देतो व येणाऱ्या काळात निधी वापरून कायमस्वरूपी रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT