sambar 
जळगाव

सांबराच्या शिंगांची तस्करी; पोलिसांनी घेतले ताब्‍यात

रईस शेख्

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटजवळ सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याच्या ताब्यातील शिंगांसह कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
भुसावळच्या खडका रोड भागातील एक तरुण स्विफ्ट कारमध्ये सांबराची शिंगे घेऊन विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे कर्मचारी दीपक पाटील यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, सुनील दामोदरे, प्रमोद लाडवंजारी, दीपक पाटील यांच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील गोलाणी मार्केटमध्ये सापळा रचला. गोलाणीच्या हनुमान मंदिराजवळ स्विफ्ट कार (एमएच १९, सीएफ ३१०६) येऊन थांबली. खबऱ्याने दिलेला क्रमांक आणि थांबलेल्या कारचा क्रमांक एकच असल्याने चालकाला काही कळण्याच्या आतच, पथकाने कार घेरून तपासणी केली. कारच्या डिकीत ठेवलेल्या खोक्यात सांबर प्राण्याची दोन शिंगे आढळून आली. 

चालक म्हणतो, मला नाही माहीत 
शिंगांबाबत कारचालक मोहम्मद तरबेज मोहम्मद गालिब (वय २२, रा. खडका रोड, भुसावळ) याची चौकशी केली असता काहीही उत्तर दिले नाही. माझ्या गाडीत कोणी ठेवले माहिती नसल्याचे तो सांगत होता. 

पोलिसांत गुन्हा दाखल 
गुन्हे शाखेने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून, शिंगे तपासण्यात आली. त्यात दोन्ही शिंगे सांबर जातीच्या हरणाची असल्याची त्यांनी खात्री केली. वन विभागच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षित प्राणी व वन्यजीव अधिनियमांतर्गत संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अटक करण्यात आलेला संशयित मोहम्मद तबरेज पूर्वी मोबाईल चोरीतही सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठवाडा भूकंपाने हादरला; नांदेड, परभणीसह हिंगोलीला भूकंपाचे धक्के

LPG EKYC: घरबसल्या मोबाइलवरच करा ई-केवायसी; आता गॅस एजन्सीवर जाण्याची अजिबात गरज नाही, कशी करावी ई-केवायसी?

Artemis 2 Splashdown Video: चंद्रावरील एक ऐतिहासिक प्रवास पूर्ण NASA चे वीर परतले, चंद्रावरुन पृथ्वीवर उतरण्याचा अद्भुत व्हिडिओ

IPL 2026: धडाकेबाज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आज कोण मारणार बाजी; कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : परभणी, नांदेड हिंगोलीला भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT