sarpanch disqualified 
जळगाव

लोकनियुक्त सरपंच तायडे अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल

प्रवीण पाटील

सावदा (जळगाव) : वाघोदा बुद्रुक (ता. रावेर) येथील लोकनियुक्त सरपंच मुकेश तायडे यांनी त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे. याबाबत मुबारक तडवी यांनी तक्रार केली होती. 
वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमाती राखीव जागेतून निकाल घोषित झाल्यापासून तायडे यांनी एक वर्ष मुदतीच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने अर्जदार यांनी १ जानेवारी २०२० ला कार्यालयात विवाद अर्ज सादर केला आहे. विवाद अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी या प्रकरणी चौकशी करणे आवश्यक असल्याने तहसीलदार रावेर यांच्याकडे पत्र देऊन चौकशी अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार तहसीलदार रावेर यांनी अहवाल सादर केलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ४ डिसेंबर २०२० ला प्रकरण निर्णयार्थ बंद करण्यात आले. सरपंच तायडे हे टोकरे कोळी जातीचे आहेत. परंतु त्यांना दिलेली कायदेशीर मुदत संपुष्टात आल्यानंतरही आजपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्यात यावे, यासाठी हा विवाद अर्ज दाखल केला होता. 

मोठे वाघोद्यात खळबळ 
अर्जावर तायडे यांनी आपली बाजू वेळोवेळी संधी देऊनही मांडली नाही. तहसीलदार रावेर यांनी चौकशी अहवाल सादर केला. ग्रामपंचायतीच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गातून सरपंचपदी निवडून आलेले आहेत. निवडून आल्यापासून एक वर्षाच्या आत जातवैधता पडताळणी समिती यांच्याकडून करून जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्या मुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले. दरम्यान, निकालानंतर गावातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे सहा हॉटेलांचे परवाने निलंबित, ७० हॉटेलांची तपासणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहराबाहेर नेण्याचा घाट कुणासाठी? बच्चू कडू अन् संजय खोडके आक्रमक, सरकारला विचारला संतप्त सवाल

Pune News: कोट्यवधींचा खर्च, तरी गळके छत! कोथरूड स्मशानभूमीचा व्हिडिओ व्हायरल; पुणे महापालिकेची धावपळ

Satara Leopard Rescue: सातारा-नित्रळ मार्गावर खळबळ! काळेश्वरी घाटात जखमी बिबट्या; वनविभागाने केले सुरक्षित रेस्क्यू

SCROLL FOR NEXT