sakal sakal
जळगाव

अंतर्गत मुल्‍यमापनाला शाळांची दांडी; केवळ दहा हजार सहाशे शाळांचा सहभाग

अंतर्गत मुल्‍यमापनाला शाळांची दांडी; केवळ दहा हजार सहाशे शाळांचा सहभाग

उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द (Ten standerd exam) केल्या आहेत. मात्र, दहावीच्या निकालाची उत्सुकता अजूनही कायम आहे. दहावीचा निकाल कसा तयार करावा, याबाबत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. यावर उपाय म्हणून राज्य मंडळाशी संलग्नित शाळांमधील (School) दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, यात राज्यातील २५ हजार ४९८ शाळांपैकी केवळ दहा हजार ५९७ शाळांनी ऑनलाइन नोंद केली आहे. अजूनही १४ हजार ९०१ शाळा ‘नॉट रिचेबल’ दिसून येत आहेत. अर्थात‌ निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे ५८.४३ टक्के शाळांनी यात सहभागच घेतलेला नाही, हे विशेष! (School poles for internal valuation Only ten thousand six hundred schools participated)

राज्यातील केवळ राज्य मंडळाशी संलग्नित सर्व दहावीच्या वर्ग असणाऱ्या शासकीय, शासकीय अनुदानित, विनानुदानित, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना सर्वेक्षणाची लिंक देण्यात आली आहे. शाळास्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करावे काय? यासाठी शाळा सक्षम व तयार आहेत काय? हे जाणून घेण्यासाठी या सर्वेक्षणाच्या माध्यमातून संबंधित शाळांचे अचूक व स्पष्ट मत मागविण्यात आले आहे.

..यावर होऊ शकते मूल्यमापन

ज्या शाळांनी, शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग घेतले आहेत, ऑनलाइन चाचण्या घेतल्या आहेत, व्हॉट्स‌ॲपच्या माध्यमातून वर्ग अथवा चाचणी घेतले आहे या सर्व बाबींचा समावेश करून अंतर्गत मूल्यमापन करता येईल. तसेच, काही शाळांनी एक किंवा दोन मिड इयर परीक्षा किंवा बोर्ड सराव परीक्षा घेतल्या असतील, त्यांचाही समावेश करून काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करता येईल. इतर शाळांना कदाचित नववीच्या परीक्षेच्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करता येईल. ज्या ठिकाणी यापैकी कोणत्याही चाचण्या अथवा परीक्षा झालेल्या नाहीत, त्या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापन करणे कठीण जाणार आहे.

शाळांनी माहिती भरण्याचे आवाहन

शालेय शिक्षण विभागातर्फे https://www.research.net/r/10INTASSESSMENT ही लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. सुरवातीला ही लिंक ९ मेपर्यंत सुरू होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे ११ मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली. मात्र, अद्याप बऱ्याच शाळा बाकी असल्यामुळे ही मुदत वाढणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शाळांनी ऑनलाइन सर्वेक्षणात माहिती भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

बॉटम टेन जिल्हे (ऑनलाइन सर्वेक्षण)

जिल्हा…. एकूण शाळा… सहभागी नसणाऱ्या शाळा…. टक्केवारी

- नागपूर…..१,१५२...……..१,१२४...…………... ९७.५६

- बुलढाणा....५७६...……... ५३५...…………….. ९२.८८

- जालना…...४८०...…….. ४११...…………….. ८५.६२

- ठाणे…….१,४९४...……..१,२६३...………….. ८४.५३

- औरंगाबाद….१,०८७...….. ८८५...……………. ८१.४१

- पालघर…... ७२६...…….. ५३१...……………. ७३.१४

- वर्धा……...३१५...…….. २३०...……………. ७०.०१

- बीड……...७१७...……. ४७७...…………….. ६६.५२

- नांदेड……. ७६८...……. ४९१...…………….. ६३.९३

- नंदुरबार….. ४०२...……. २५६...…………….. ६३.६८

नाशिक विभाग

ऑनलाइन माहिती भरणाऱ्या शाळा

जिल्हा……. एकूण शाळा.. सहभागी शाळा... टक्केवारी

नाशिक…….१,२०७ ……....७१८...…... ५९.४८

जळगाव……. ८५७...…….. ४५९...…... ५३.५५

धुळे……….. ४९४...……..३००...…... ६०.७२

नंदुरबार ४०२ १४६ ३६.३१

एकूण दोन हजार ९६० एक हजार ६२३ ५४.८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे मिळालेल्या मदतीची रक्कम वजा करून मदत दिली जात - संजय पाटील घाटणेकर

SCROLL FOR NEXT