parth pawar robot
parth pawar robot  
जळगाव

Video पार्थ पवारची कमाल..स्‍वतःचीच कल्‍पना अन्‌ क्रिया; साकारला घरात फिरणारा आणि काम करणारा रोबो

राजेश सोनवणे

जळगाव : चालता-फिरता आणि रिमोटच्या सहाय्याने कामे करणारा रोबोट हे मोठ्या कंपन्यांमध्ये असल्‍याचे माहीतच आहे; पण घरात फिरणारा आणि एका ठिकाणाहून दुसरी वस्‍तू आणून देण्याची मदत करणारा रोबो हे प्रत्‍यक्षात कोणी आणलेले नाही. परंतु, सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ते करून दाखविले. ते देखील स्‍वतःची कल्‍पना आणि कोणाच्याही मदतीशिवाय. 


धरणगाव येथील बालकवी ठोंबरे माध्यमिक विद्यालयातील सातवीमधील विद्यार्थी पार्थ महेश पवार याने हा चालता-फिरता रोबोट साकारण्याची किमया केली आहे. जो आज पार्थच्या बोटांच्या इशाऱ्यावर चालतोय आणि सांगेल ते काम करत आहे. विशेष म्‍हणजे, पार्थचे वडील एक शेतकरी आणि आई गृहिणी आहे. त्यामुळे कोणी त्‍याला मार्गदर्शन करणारे नव्हते. रोबोट बनविण्यासाठी लागेल ती वस्तू आणून देण्यासाठी वडील महेश पवार हे नेहमी पुढे राहिले. तर आईचा रोबोट बनविण्यासाठी हातभार लागला. पण सर्व कल्‍पना ही महेशचीच राहिली. 

लॉकडाउनची शाळा बंद अन्‌ पार्थची क्रिएटिव्हिटी 
कोरोना महामारीला देशात सुरवात झाल्‍यानंतर मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाउन झाला. तेव्हापासून शाळादेखील बंद झाल्‍या. शाळा बंद असल्‍याने अनेक विद्या‍र्थ्यांनी सुटीचा आनंद घेतला. मात्र पार्थने काहीतरी वेगळे करायचे, या उद्देशातून आपले प्रयत्‍न सुरू ठेवले. अशात त्‍याच्या काकांनी कंपनीत रोबोट काम करत असल्‍याचे पार्थला सांगितले आणि यातून कल्‍पना सुचली व रोबोटनिर्मितीस सुरवात केली. अर्थात लॉकडाउनचा पुरेपूर उपयोग घेत पार्थने चार महिन्यांच्या कालावधीत एक चालता- फिरता रोबोट तयार केला. 

रोबो बनविण्यासाठी याचा केला वापर 
प्लायवूड, चार इलेक्‍ट्रिक मोटार (तीन वॅट), दोन इलेक्‍ट्रिक मोटार (१२ वॅट), वायर, १२ व्होल्‍ट बॅटरी (हलक्‍या वजनासाठी लॅपटॉपमधील तीन वॅटच्या चार बॅटरी), डायोड, रेझिस्‍टंन्स, वायर, चार चाकं. 

घरातील सदस्‍य बनला पार्थचा रोबो 
चार महिन्यांच्या प्रयत्‍नानंतर चालता-फिरता रोबो साकारण्यात पार्थला यश मिळाले. हे घरातल्‍या सदस्‍यांसाठी निश्‍चितच कौतुकाची बाब आहे. त्‍या रोबोला रिमोटच्या सहाय्याने घरात पार्थ फिरवत आहे. इतकेच नाही तर काही वस्‍तू आणून देण्यासाठी रोबो कामी येत असल्‍याने तो एक प्रकारे घरातील सदस्‍यच बनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT