second marriage 
जळगाव

चार लेकरांची माय..तरीही थाटला दुसरा संसार, पतीलाही ऐकून बसला धक्‍का

राजु कवडीवाले

यावल (जळगाव) : प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात, ते खरंय..पतीसह चार लेकरांची आई असलेल्या विवाहित महिलेचे प्रेम माहेरच्या एका व्यक्तीसोबत जडले आणि पतीने याची गंभीर दखल घेत पत्नीसह तिघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
तालुक्यातील नायगाव येथील एका विवाहितेने पती व पोटची चक्क चार मुले असूनही त्यांना सोडून दुसऱ्याबरोबर पतीला न कळत संसार थाटला. हा प्रकार उघडकीस येताच पतीने या विवाहितेविरुद्ध पती हयात असताना व घटस्फोट दिला नसताना दुसऱ्या पुरुषाबरोबर संसार थाटला म्हणून येथील पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 

किरकोळ भांडणावरून गेली माहेरी अन्‌
नायगाव (ता. यावल) येथील प्यारसिंग भाया बारेला याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याची पत्नी बोंदरीबाई प्यारसिंग बारेला (वय ३८) हिस नऊ, आठ, सहा व दीड वर्षीय असे चार अपत्ये आहेत. घरगुती किरकोळ भांडणावरून बोंदरीबाई ही गेल्या वर्षी आपला पती प्यारसिंग बारेला याच्याशी भांडण होऊन माहेरी धोपा (ता. भगवानपुरा, जि. खरगोन) या गावी निघून गेले होती. तेव्हापासून प्यारसिंग बारेला याने अनेक वेळा नातलग इतर मित्र मंडळी घेऊन पत्नीने आपल्याकडे परत यावे, यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, बोंदरीबाई येण्यास तयार नव्हती. 

ऐकून पतीलाही बसला धक्‍का
दरम्‍यान, प्यारसिंग बारेला हा नुकताच मध्यप्रदेश येथे जाऊन आला असता त्यास एक धक्कादायक बातमी मिळाली. चार लेकराची आई असलेली बोंदरीबाई हिने काही महिन्यांपूर्वीच भोल्या इन्तू वास्कले (रा. गोंट्या, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) याच्याशी लग्न लावून घेतले आहे. एकूणच हा प्रकार धक्कादायक असल्याने त्याने तत्काळ तेथून यावल पोलिस ठाणे गाठून आपण हयात असताना व पत्नी बोंदरीबाईने आपल्याशी फारकत न घेता नवीन संसार थाटला म्हणून पत्नी बोंदरीबाईसह तिचे वडील तुताराम अंकऱ्या बारेला व तिचा पती भोल्या वास्कले यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT