farmer suicide 
जळगाव

कर्जाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

जामनेर/कुऱ्हा काकोडा (जळगाव) : कर्ज आणि सततच्या नापिकीला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कापूसवाडी (ता. जामनेर) येथील अशोक दलपत जाधव (वय ५०) व बोदवड (ता. मुक्ताईनगर) येथील विलास गुलाबराव पाटील (वय ४०) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. 

पहाटेच संपविली जीवनयात्रा
कापूसवाडी येथी‍ल अशोक जाधव यांनी आज (ता. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरातच विषारी पदार्थाचे सेवन करून जीवनयात्रा संपविली. सकाळी पत्नी व मुलगा यांना घटना समजली तोपर्यंत खूप वेळ झाला होता. त्यांची दोन एकर कोरडवाहू शेती असून, मुलींचे लग्न आणि शेती कसण्यासाठी त्यांनी कोटा ग्रामविकास फायनान्सकडून एक लाख आणि सोसायटीचे सुमारे चार लाख असे पाच लाखांवर कर्ज घेतले असल्याचे सांगण्यात येते. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. आर. के. पाटील यांच्या माहितीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

सतत नापिकीमुळे टोकाचे पाऊल
दुसऱ्या घटनेत बोदवड येथील विलास पाटील यांनी सोमवारी (ता. १५) राहत्या घरात विषारी द्रव्य सेवन केले होते. त्यांना मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी बँक व उसनवारीचे कर्ज असल्याचे समजते. त्यातच सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त होते. शिवाय खासगी कर्जाच्या परतफेडीसाठी सुरू असलेल्या तगाद्यामुळे बेजार झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT