tenth-standred-Oral-examination tenth-standred-Oral-examination
जळगाव

दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प अहवाल करून घेताना शिक्षकांची दमछाक

दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परिक्षा; प्रकल्प अहवाल करून घेताना शिक्षकांची दमछाक

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : शासनाने दहावी, बारावीच्या परिक्षा रद्द करून अनूक्रमे नववी, अकरावीच्या गुणश्रेणीवरून दहावी, बारावीचे गुणांकन करण्यास सांगितले आहे. अनेक शाळांमधील दहावीचे परिक्षा दिलेले विद्यार्थी परगावी गेलेले आहेत किंवा नोकरी, इतर कामासाठी गावी गेले आहेत. (jalgaon-tenth-standred-Oral-examination-Teachers-reporting-the-project)

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तीन विषयाच्या तोंडी परिक्षा व विज्ञान विषयाचे प्रकल्प अहवाल करून घ्यावे असे शिक्षकांना सांगितले आहे. मात्र विद्यार्थी परगावी गेलेले असल्याने त्यांना बोलाविण्यासाठी फोन करणे, त्यांना तोंडी परिक्षेला या, विज्ञानाचे प्रकल्प अहवाल घरूनच करून आणा असे वारंवार सांगूनही अनेक विद्यार्थी ते सादर करीत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे २५ जूनच्या आत शिक्षकांना ऑनलाईन मार्क्स शिक्षण विभागाला कळवायचे आहेत. यात शिक्षकांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

असे द्यावयाचे आहेत गुण

दहावीची परिक्षा नसली तरी मागील इयत्तेतील त्या त्या विषयातील गुण, मराठी, इंग्रजी, हिंदी या विषयाची तोंडी परिक्षा घ्यावी, त्यात मिळालेले गुण, विज्ञान १ व २ विषयाचे स्वाध्यायाचा प्रकल्प अहवाल (प्रॅक्टीकल ऐवजी) त्यात मिळालेले गुण, इतिहास, भूगोल विषयाची प्रश्‍नावली द्यावी, बहूपर्यायी उत्तरे देवून ती सोडवून घेणे (प्रत्येकी १० गुण) यात मिळालेले गुण यावरून सरासरी काढून विद्यार्थ्यांना त्या– त्या विषयात गुण द्यावयाचे आहेत.

शिक्षकांचे फोन मात्र विद्यार्थी येईनात

प्रकल्प अहवाल तपासणी, तोंडी परिक्षेसाठी विद्यार्थ्याने शाळेत येणे अपेक्षीत आहे. यासाठी त्याला किंवा त्याच्या पालकांना शिक्षक फोन करून शाळेत येण्यास सांगतात. मात्र या-ना त्या कारणाने विद्यार्थी येत नसल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांनी शाळेतून फोन आल्यास तोंडी परिक्षा देण्यासाठी व प्रकल्प अहवाल सादर करण्यास जावे, यातून विद्यार्थ्यांचे गुण वाढतील हे विद्यार्थ्यांने समजावून घेण्याची गरज असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

नापास झाला तर दोष शिक्षकांना?

काही शिक्षकांच्या मते जर विद्यार्थी तोंडी परिक्षा व प्रकल्प अहवाल सादर करण्यास आला नाही. तर त्याला कोणत्या आधारे त्याविषयात उत्तीर्ण करणार? जर विद्यार्थी नापास झाला तर आमचा पाल्य कसा नापास झाला? असे प्रश्‍न पालक आम्हाला विचारून दोषी ठरवतील. यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत बोलविणे आल्यास जावे अशी अपेक्षा शिक्षकांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : राहुल गांधी कोण आहेत हे भारतातील जनतेला माहित आहे - फडणवीस

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT