

Vaibhav Sooryavanshi | East Zone Team
Sakal
भारतीय क्रिकेटच्या २०२६-२७ हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या बीसीसीआयच्या प्रमुख प्रथम श्रेणी स्पर्धांपैकी एक असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून (Duleep Trophy) या हंगामाला सुरूवात होईल.
२३ ऑगस्टपासून बंगळुरूमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी आता पूर्व विभागाचा संघ (East Zone Team) जाहीर झाला आहे. या संघात आसाम, बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा आणि त्रिपुरा या राज्य संघांतील मिळून १५ जणांना संधी देण्यात आली आहे.