papaya crop 
जळगाव

शेतात नीलगायीचा शिरकाव; पपईच्‍या पिकाचे नुकसान

शेतात नीलगायीचा शिरकाव; पपईच्‍या पिकाचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

तोंडापूर (जळगाव) : दि अजिंठा डोंगररांगामधील वन्यप्राणी निलगायीकडून तोंडापूर परिसरातील शेतकऱ्यांचे पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. (tondapur-aria-nilgai-farm-Loss-of-papaya-crop)

तोंडापूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणींचा वावर आहे. तोंडापूर येथील शेतकरी उषाबाई वसंत पाटील यांचे शेत ढालसिंगी शिवारात असून त्याच्या गट क्र ५८ या ७ एकर श्रेत्रात सहा हजार पपई रोपांची लागवड करण्यात आली आहे. हा परिसर अजिंठा डोंगररांगामध्‍ये असल्याने शिवारात निलगायींची वावर मोठ्यात प्रमाणात असतो. शेतातील चार हजार पपई झाडांचे निलगाय वन्यप्राणीकडून नुकसान करण्यात आले आहे.

नुकसान भरपाईसाठी अर्ज

तोंडापूर परिसराला लागून अजिंठा डोंगररांगा असल्याने मोठ्या प्रमाणात हरीण, नीलगाय, रानडुक्कर, मोर, अस्वल व इतर प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे वनविभागाच्या वतीने ग्रस्त घालण्यात यावी व शेतकऱ्यांना नुकसान होवु नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. पपई पिकाच्‍या नुकसानीबाबत वनविभाग जामनेर याच्याकडे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई अर्ज करण्यात आला आहे. वन रक्षक पि. बि. काळे व कर्मचारी शब्बीर पिंजारी यानी नुकसानीचा पंचनामा केला.

अन्‍न पाण्याच्या शोधात

अन्न पाण्याच्या शोधात ते गाव वस्तीकडे भटकंती करत असतात. त्यामुळे या भागात कपाशी, तुर, मका, कडधान्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वन्यप्राणींकडून होत असते. सध्या शेतीत मशागत व पेरणीचे कामे सुरु असल्याने व वन्यजीवांना अन्न मिळत नाही. तोंडापूर परिसरात बागायती शेताकडे मोर्चा वळवत केळी, पपई व अन्य बागायती पिकाचे नीलगाय व हरीण यांच्याकडून नुकसान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT