corona child dead 
जळगाव

बालकांना कोरोना होत नाही म्हणून गाफिल नको..जळगावात दोन वर्षीय बालकाचा मृत्‍यू

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अतिशय तिव्र स्‍वरूपात पसरत आहे. या लाटेत प्रामुख्यान तरूण पिढी देखील लवकर बाधित होत असून जिल्‍ह्‍यात एका बालकाला कोरोनाची लागण होवून तिचा मृत्‍यू झाल्‍याचा प्रकार घडला आहे.
अमळनेर येथील दोन वर्षीय बालकाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारादरम्‍यान शनिवारी रात्री मृत्‍यू झाला. या बाळाला मागील आठ दिवसांपासून आजारी होता. त्‍यास न्युमोनियाची लागण झाल्‍याचे रिपोर्टमध्ये स्‍पष्‍ट झाले होते. मात्र त्‍याची पहिली कोरोना टेस्‍ट निगेटीव्ह आली. 

चोवीस तासातच प्राणज्‍योत मालवली
अशा स्‍थितीत त्‍यास खासगी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बाळाची प्रकृती अधिक खालावली असल्‍याने उपचार करण्यास नकार दिला. यानंतर त्‍यास शुक्रवारी (२६ मार्च) शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. येथे त्‍यास व्हेंटीलेटर लावण्यात आले होते. मात्र उपचाराचा फरक न पडल्‍याने बाळाचा चोवीस तासाच्या आत मृत्‍यू झाला. 

बाधित होण्यात युवकांचे प्रमाण वाढले
कोरोनाचा अधिक त्रास वृद्ध किंवा आजार असलेल्‍यांना जाणवत असल्‍याचे पहिल्‍या लाटेत सांगण्यात येत होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्‍यानंतर यात बाधित होणाऱ्यांमध्ये युवक वर्गाचे प्रमाण अधिक वाढले आहे. इतकेच नाही तर कोरोनामुळे मृत्‍यू होण्याचा धोका देखील अधिक वाढला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; 84 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT