gold robbery 
जळगाव

सुवर्णपेठीतून खरेदी करून निघाले; अवघ्‍या पाच मिनिटाच्या अंतरावर गेले अन्‌ पिशवी पाहून हादरली महिला

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहरातील सुभाष चौकातील ज्वेलरी खरेदी करण्यासाठी माहेरी आलेल्या विवाहितेच्या पिशवी कापून पिशवीतील १ लाख २२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे २३ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शहारातील पारखनगरतील माहेर असलेल्या माला राकेशकुमार मालानी (वय ५३ रा. कालानीनगर, इंदौर) या जळगाव भावाच्या भेटीसाठी आल्या होत्‍या. सर्वांची भेट झाल्‍यानंतर सोने खरेदी करण्यासाठी मंगळवारी दुपारी माला मालानी ह्या त्यांच्या भावजायीसोबत सुभाष चौकातील बाफना नयनतारा ज्वेलर्स येथे सोने खरेदीसाठी आल्‍या. येथून त्यांनी १ लाख २२ हजार ८०९ रूपये किंमतीचे ब्रासलेट व कानातील टॉप्स असे सोन्याचे दागिने खरेदी केले. त्यानंतर सिल्वर शोरूम गेले. 

अवघ्‍या पाच मिनिटात दागिने गायब
सुवर्णपेढीतून बाहेर निघाल्‍यावर दोन्ही महिला सिल्‍व्‍हर शोरूममध्ये गेल्‍या. या दुकानावर पोहचताच त्यांनी पिशवीत दागिने पाहिले असता त्‍यात ते आढळून आले नाही. अज्ञात चोरट्यांनी पिशवी कापून सोन्याचे दागिने लंपास केल्याचे त्‍यांचे लक्षात आले. यानंतर महिलांनी धावपळ करत सुवर्णपेढीत विचारणा केली असता आढळून आले नाही. यानंतर पोलिस स्‍टेशन गाठत महिलेने दिलेल्‍या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Harish Rana Last Video: 'सगळ्यांची माफी मागून जा...'; हरीश राणाच्या इच्छा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कुटुंबाला अश्रु अनावर

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

SCROLL FOR NEXT