women torture 
जळगाव

मुलबाळ होत नसल्‍याने छळ; माहेरुन दहा लाख आणण्याचा तगादा

रईस शेख

जळगाव : शनीपेठ येथील माहेर व भडगाव येथील सासर आलेल्या विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी १० लाख रूपये आणावे आणि मुलबाळ होत नाही म्हणून शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पेालिसांत दिलेल्या तक्रारी नुसार ईश्वरी राहुल सुर्यवंशी (वय ३२, रा. भडगाव ह.मु.शनीपेठ जळगाव) यांचे भडगाव येथील राहुल सुर्यभान सुर्यवंशी यांच्याशी २०१३ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्न झाल्यापासून आतापर्यंत त्यांना मुलबाळ झाले नाही. या कारणावरून पती राहुल सुर्यवंशी यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्‍याला सासू सुमनबाई सुर्यवंशी, जेठ महेंद्र सुर्यवंशी, नणंद अनिता अशोक महाजन, नंदोई अशोक बाबुराव महाजन यांनी देखील टोचून बोलणे व शिवीगाळ केली. हा अत्याचार असह्य न झाल्याने विवाहितेने जळगावातील आई-वडीलांना हकीकत सांगितली. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह इतर चार जणांना शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल कवळे करीत आहे. 

सोबतच दहा लाखाचा तगादा
मुलबाळ होत नसल्‍याने छळ होत असतानाच गेल्‍या काही महिन्यांपासून प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरून दहा लाख रूपये आणण्याचा तगादा ईश्‍वरी सुर्यवंशी यांच्यामागे लावण्यात आला होता. याकरीता देखील छळ होत असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ayodhya: अयोध्येत सापडला ३०० वर्ष जुना खजिना! हाताने लिहिलेली 'रामचरितमानस'ची दुर्मिळ प्रत समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

SCROLL FOR NEXT