munjoba tempal atrawal 
जळगाव

भाविकांची गर्दी उसळल्याने मंदिराला टाळे; दहा हजार दंड 

राजु कवडीवाले

यावल (जळगाव) : तालुक्यातील प्रसिद्ध मुंजोबा महाराज देवस्थानावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रोत्सव रद्द असतानाही सोमवारी (ता. २२) भाविकांची गर्दी उसळली होती. तहसीलदार महेश पवार, पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिसांनी गर्दीला पांगवून मंदिरास टाळे ठोकले. तसेच विश्वस्त समितीने याबाबत उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाने विश्वस्त समितीकडून दहा हजार दंड वसूल केला. तहसीलदार महेश पवार यांनी दुजोरा दिला आहे. 
याशिवाय गंगानगरमध्ये एका विवाह सोहळ्यात आणि माधवनगरात एका जावळाच्या समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्याने पालिका प्रशासनाकडून दोघे ठिकाणी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच शहरात तेरा दुकानदारांकडून प्रत्येकी पाचशे प्रमाणे एकूण साडेसहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. येथे तब्बल साडेसव्वीस हजाराचा दंड वसूल आला आहे. पोलिस प्रशासनाने कारवाई करत ३१ जणांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे सहा हजार दोनशे रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर गेल्या दोन दिवसात ३० जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे १५ हजाराचा दंड वसूल केला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कडक कारवाईचा इशारा
लग्नसराईत गर्दी वाढू नये, यासाठी पालिका व पोलिस प्रशासन यांची करडी नजर असून, विवाह सोहळ्यात नियमांचे पालन, सामाजिक अंतर किंवा मास्क न लावलेली व्यक्ती आढळल्यास कारवाई केली जात आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT