One day old baby 
जळगाव

एक दिवसाचे अर्भक टाकले रस्‍त्‍यावर; माता झाली गायब

राजु कवडीवाले

यावल (जळगाव) : धानोरा रस्त्यावर एका अज्ञात महिलेने अवघे एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक रस्त्याच्या बाजूला सोडून पलायान केल्याची घटना रविवारी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे अर्भकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथून या अर्भकाला जळगाव नेण्यात आले आहे.

दोघे गाडीवर आले अन्‌ बाळाला सोडून गेले
दुपारी साडे बाराच्या सुमारास डांभुर्णी शिवारातील एका शेतात लाल रंगाची साडी परिधान केलेली महिला व पुरुष दुचाकीने आले आणि त्यांनी शेताच्या बांधावर अर्भकाला सोडून निघून गेल्याची शेतमजूर महिलेसह पिक सरंक्षण सोसायटीचे रखवालदार देविदास सोळुंके यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत डांभुर्णीचे पोलिस पाटील किरण कचरे यांना माहिती दिली.

अर्भक रूग्‍णालयात दाखल
सदरच्या घटनास्‍थळी पोलिसांनी पाहणी केली असता नवजात बालक हे पुरूष जातीचे असल्‍याचे उघड झाले. यानंतर पोलिसांच्या मदतीने अर्भकास प्रथम यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. यानंतर जळगाव जिल्‍हा रूग्‍णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिस पाटील किरण कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यावल पोलिस स्टेशनला महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहेत

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT