zero shadow day zero shadow day
जळगाव

जळगावात २५ मेस सावली होणार गायब; फेसबुक लाईव्हवर पाहता येणार

जळगावात २५ मेस सावली होणार गायब; फेसबुक लाईव्हवर पाहता येणार

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : सूर्य डोक्यावर येऊन आपली सावली (zero shadow day) गायब होण्याचा वर्षातून केवळ दोनदा येणारा योग येत्या २५ मे रोजी अनुभवास मिळणार आहे. (jalgaon news zero shadow day facebook live)

सूर्य दररोज दुपारी १२ वाजता डोक्यावर येतो, असे मानले जाते. प्रत्यक्षात, तसे रोज होत नाही. सूर्य वर्षातून फक्त दोनच वेळेस आपल्या डोक्यावर येतो. सौर घड्याळ (सनडायल) नुसार १२ वाजता व हातातील घड्याळानुसार (भारतीय प्रमाण वेळ) १२ वाजून काही मिनिटांनी डोक्यावर येतो आणि आपली सावली इकडे तिकडे न पडता पायापाशी पडते. निसर्गाच्या या अदभूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीरो शॅडो डे’ असे म्हणतात.

क्षण दुसऱ्यांदा अनुभवास

२५ मी रोजी सूर्य २१.०० अक्षांशावर उगवतो त्यादिवशी १२ वाजून २४ मिनिटे ४५ सेकंद या वेळी आपण ‘शून्य सावलीचा क्षण’ अनुभवतो. २१ जूननंतर परतीच्या प्रवासात १६ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन (सूर्याची क्रांती) परत आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे ‘शून्य सावलीचा क्षण’ आपल्याला अनुभावास मिळतो.

फेसबुक लाइव्ह

यावर्षीही लॉकडाऊन असल्यामुळे ‘झीरो शॅडो डे’ प्रसंगाचे फेसबुक लाइव्ह २५ मेस दुपारी १२ वाजेपासून (https://www.facebook.com/amogh.joshi.1972) या लिंकवरुन करणार आहोत. सर्व खगोलप्रेमींनी या भौगोलिक घटनेचा आनंद घ्यावा व त्या मागील विज्ञान समजून घ्यावे, असे आवाहन अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केक तोंडाला लावल्यानं बर्थडे बॉयने तिघांवर झाडल्या गोळ्या; नगरसेवकाच्या २ भावांसह पुतण्याचा मृत्यू, फरार आरोपीचा शोध सुरू

Shaktipeeth highway : 'शक्तिपीठ'च्या नवीन आरेखनाविरोधात पहिल्या मोर्चाचे नेतृत्व जयंत पाटील करणार, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार

Latest Marathi News Live Update: डोंबिवलीत पुस्तकांचा महासागर,नेहरू रोड फडके रोड बनला बुक स्ट्रीट,वाचकांचा महापूर

Rahul Korde कुस्तीसाठी जाताना चक्कर आली, २० वर्षीय पैलवानाचं निधन; महाराष्ट्र केसरीत पटकावलेलं सुवर्णपदक

Hacking Safety Apps : हॅकरला फुटेल घाम! 'या' 5 ॲप्स बनवतील तुमच्या मोबाईलला एकदम सुरक्षित, एकतर नक्की डाउनलोड करा

SCROLL FOR NEXT