Help Help
जळगाव

शेवटी..कुटुंबाला मिळाला ५० लाखाचा धनादेश

अधिकार असल्याने तिला देखील उदरनिर्वाहासाठी पैशाची अपेक्षा होती

उमेश काटे

अमळनेर : जवखेडा (ता.अमळनेर) येथील पोलीस पाटील उल्हास लांडगे यांचा कोरोनाच्या (Corona) काळात मृत्यू (Death) झाला होता. या पार्श्वभूमीवर (Government) शासनातर्फे ५० लाखाचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. दरम्यान कुटुंबाची (Family) परिभाषा न कळल्यामुळे रकमेवरून सासू-सुनेत झालेले गैरसमज पोलीस, प्रशासन व समाजबांधवाच्या मध्यस्थीने मिटवण्यात येऊन दोघात समजोत्याने रक्कम वितरित करण्यात आली.(corona death family government help fund)

जवखेड्याचे पोलीस पाटील उल्हास लांडगे याना गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. शासनाने कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या कुटुंबाला ५० लाख रुपये अनुदान जाहीर केले होते. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस पाटील संघटना यांनी कागदोपत्री पाठपुरावा करून शासन दरबारी आमदार अनिल पाटील यांनी प्रयत्न केल्याने लांडगे यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये अनुदान मंजूर झाले.

वाद मिटवण्यात यश

मात्र कुटुंबाच्या व्याख्येत पत्नी आणि मुले असा गैरसमज होऊन संपूर्ण रक्कम आपलीच आहे असा ग्रह झाला होता मात्र लांडगे यांची वृद्ध माता ही देखील कुटुंबाची सदस्य आहे आणि मुलाच्या अनुदानात कुटुंब सदस्य म्हणून तिचाही अधिकार असल्याने तिला देखील उदरनिर्वाहासाठी पैशाची अपेक्षा होती. सासू सुनेतील मतभेद दूर करण्यासाठी समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस पाटील संघटना एकत्र येऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या समक्ष हा वाद मिटवण्यात आला आणि पोलीस पाटील यांच्या वृद्ध मातेला ८ लाख ११ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला.

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते कुटुंबाला धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील , तालुकाध्यक्ष भानुदास पाटील , दक्षता समितीचे संदीप घोरपडे , बन्सीलाल भागवत , डी ए धनगर , प्रा.अशोक पवार , प्रा.मनोज रत्नपारखी , एस सी तेले , आंनदा बच्छाव , प्रा.दिनेश भलकार , जगदीश भागवत , आर पी धनगर , पोलीस नाईक शरद पाटील हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT