जळगाव

मागणी वाढल्याने खाद्यतेलाचे भाव कडाडले 

किशोर पाटील

वावडे (ता. अमळनेर) : साठेबाजी आणि सणासुदीनिमित्त वाढलेल्या मागणीमुळे खाद्यतेलाचे भाव चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेटही कोलमडले असून, खाद्यतेलाच्या दरात महिन्याभरात किलोमागे दहा रुपये वाढ झाली आहे. सामान्य जनतेला कोरोनाशी लढत असताना आता जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना करावा लागत आहे. 


तालुक्यात दररोज १८ लाख लिटरची विक्री केली जात असून, त्यात सोयाबीन तेलाची विक्री सर्वाधिक आहे. नवीन पीक बाजारात येण्यासाठी बराच कालावधी असून, साठेबाजांनी तेलाची खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे साठेबाजाच्या हातात तेल बाजार सापडला आहे. परिणामी, गेल्या महिन्याभरात खाद्यतेलाच्या भावात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने खाद्यतेलाची मागणी वाढलेली आहे. ही मागणी लक्षात घेता साठेबाजांनी डाव साधला आहे. 

भावातील फरक (प्रतिकिलो) 
ऑगस्ट २०१९ चे दर (रुपयांत) 
सोयाबीन : ८५ ते ८७ 
शेंगदाणा : १२५ 
सोयाबीन तेल डबा ः १,३५० ते १,३७० 

ऑगस्ट २०२०चे दर 
(रुपयांत) 
सोयाबीन : १०५ 
शेंगदाणा : १४० 
सोयाबीन तेल डबा : १,४७० ते १,५१० 


बाजारात सोयाबीन तेलाचा डबा १,४७० ते १,५१० भावाने विक्री होतो. शहरातील ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ग्राहकांची सोयाबीन तेलाची मागणी असते. परंतु, आता भाववाढ झाल्याने याचा परिणाम विक्रीवर जाणवत आहे. 
-हरीश शहा, 
बालाजी ट्रेडर्स तथा अध्यक्ष, किरकोळ किराणा व्यापारी संघ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT