pik vima fraud 
जळगाव

पीकांचा विमा नव्‍हे; त्‍याने बांधले शेतकऱ्यांच्या पैशांचे छत... विम्याचे पैसे घेऊन गंडा 

अमोल पाटील

अमळनेर : मागील वर्षी शेतकऱ्यांनी भरलेली पीक विम्याची रक्कम विमा कंपनीला न वर्ग करता स्वतः खर्च करून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचा पीक विमा बुडाला असून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. या फसवणुकीतून मार्ग काढून पीक विमा रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

गतवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस, मका, ज्वारी आदी पिकांसाठी विमा काढला होता. हा विमा ऑनलाइन काढायचा होता. त्यामुळे शेतकरी सायबर कॅफेवर गर्दी करत होते. अनेक शेतकरी अनाडी असल्याने त्यांना संगणकातली माहिती नव्हती तालुक्यातील दहिवद, पातोंडा, नगाव, गडखांब, हेडावे, वावडेसह अनेक गावातील शेतकऱ्यांनी वेदांत कॅफे नावाच्या सायबर कॅफेवरून पीक विमा काढला होता. शेतकऱ्यांनी पीक विमाचे येणारे पैसे भरून संगणक चालकांकडून त्याची फी देऊन पावती देखील घेतली होती. अतिवृष्टीमुळे सुमारे वर्षभरानंतर पीक विमा मंजूर होऊन काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्‍कमा जमा झाल्या. काही शेतकरी बँकेत गर्दी करू लागले मात्र अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या नावावर रकमा जमा झाल्या नाहीत. त्यावेळी हे गौडबंगाल उघडकीस आले. 

विमा कंपनीकडे शेतकऱ्यांच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नसल्याने विमा मंजूर झाला नाही, वावडे येथील जगदीश सीताराम पाटील यांनी ‘वेदांत कॅफे’चे चालक गिरीश पाटील यांच्याकडे चौकशी केली असता त्याने पावती बनावट समजा असे उत्तर दिले त्यामुळे जगदीश पाटील आणि नगाव येथील गौरव गोसावी, गणेशगिर गोसावी, रमेशगिर वनागिर गोसावी, लक्ष्मणगीर गोसावी, मधुकर हनुमंत पवार या शेतकऱ्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ व प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे लेखी तक्रार करून वेदांत कॅफे चालकांवर कारवाई करून पीक विमा मिळण्याची मागणी केली आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांनी तोंडी तक्रार करताना सांगितले की, संगणक चालकाने पावत्या एडिट करून शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या पावतीवर नाव टाईप करून पावत्या दिल्या आहेत. 
 
रॅकेट असण्याची शक्यता 
दरवर्षी कापूस विमा मंजूर होत नसल्याने शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची रक्कम वाया जात होती. त्यामुळे संगणक चालकाने शेतकऱ्यांच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे न भरता परस्पर हडप केली. मात्र यंदा कापसाला विमा मंजूर झाल्याने ही बाब उघडकीस आली आहे. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची या प्रकरणी फसवणूक झाली आहे. यात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 

संपादन : राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT