जळगाव

शासकीय कापूस खरेदीत ‘मापात पाप’;सहाय्यक निबंधकांचा दणका वसूल 

हिरालाल पाटील

कळमसरे (ता. अमळनेर) : धरणगाव येथील जिनिंग मालकाकडून कापूस खरेदीत बेकायदेशीर कपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, ‘गावराणी जागल्या’ संघटनेच्या दक्षतेने सहाय्यक निबंधकांच्या आदेशानुसार संबंधित जिनिंग मालकाकडून प्रति १३ क्विंटल कापसाची सुमारे ४६ हजार ६९५ रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची शासकीय कापूस खरेदीत जिनिंग चालकांकडून होणारी पिळवणूक पुढे आली आहे. 


गडखांब (ता. अमळनेर) येथील शेतकरी रमेश पाटील, भालेराव पाटील व प्रकाश पाटील या तिन्ही भावांनी नोंदणीनुसार १० जुलैला अमळनेर बाजार समितीमधून टोकन प्राप्त करून धरणगाव येथील शासकीय खरेदी केंद्र असलेल्या एस. के. कॉटन इंडस्ट्रीज नावाच्या जिनिंगला नेला. त्याचप्रमाणे रमेश पाटील यांचा कापूस मोजण्यासाठी नंबर आला. त्या वेळी प्रतवारी केल्यानंतर कापूस मोजण्यासाठी जिनिंगच्या इलेक्ट्रॉनिक वजन भुईकाट्यावर वाहनाची मोजणी केली. त्यानंतर विक्री झालेल्या मालात प्रतिक्विटंल १३ किलो कटती लावण्यात आली. त्याप्रमाणे त्यांनी एकूण मालाच्या बेकायदेशीर वजनापैकी अनधिकृतरीत्या कटती केलेली आठ क्विंटल ७२ किलो वजनाची घट म्हणून कपाशी वजन लावण्यात आले. 

सहाय्यक निबंधकांकडे मागितली दाद 
संबंधित कट्टी शासन नियमाने करता येत नाही म्हणून या शेतकऱ्याने तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात १५ जुलैला एस. के. कॉटन इंडस्ट्रीजविरोधात बेकायदेशीर कटतीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाची दखल घेऊन सहाय्यक निबंधक कार्यालयाने या इंडस्ट्रीजला नोटीस पाठवून कागदपत्रांसह तक्रारीची शहानिशा व पडताळणी चौकशीसाठी अमळनेर कार्यालयात १० ऑगस्टला बोलावले होते. त्या वेळी अर्जदार शेतकऱ्यांनाही आपली बाजू मांडण्यासाठी बोलावले होते. 

...अन् रक्कम केली परत 
या वेळी प्रथम संगणकाद्वारे मोजणी झालेला कापूस आणि नंतर कटती केलेल्या वजनाची दिलेली पावती यात फरक आढळून आली. त्यात जिनिंग मालकाने कापसाची घट म्हणून लावलेली बेकायदेशीर कपात आठ क्विंटल ७१ किलो मालाची कपात केलेली रक्कम रुपये ४६ हजार ६९५ रुपये रोखीने जिनिंग मालकाने सहाय्यक उपनिबंधक यांच्या समक्ष शेतकऱ्याला रोख स्वरूपात परत केली आहे. त्याबाबत पंचांसमक्ष ही रक्कम संघटनेने वसूल केली आहे. जिनिंगमालक मुर्तजा शाकीर, येथील ‘गावराणी जागल्या’ संघटनेचे संघटक हिरालाल पाटील, नियोजित तापी उपसा सिंचन योजनेचे अध्यक्ष दिनकर पाटील, कार्यकारी सदस्य अरुण देशमुख, अध्यक्ष सत्यशोधक पाटील व ईश्वर कोळी व अन्यायग्रस्त शेतकरी रमेश पाटील, प्रकाश पाटील, भालेराव पाटील आदी उपस्थित होते. 
 

संपादन-भूषण श्रीखंडे

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

SCROLL FOR NEXT