जळगाव

अन..रस्त्याच्या मधोमध मोर पिसारा फुलवून थुईथुई नाचला

उमेश काटे

अमळनेर : अन अचानक लोकवस्तीत, रस्त्याच्या मधोमध एक मोर पिसारा फुलवून थुईथुई नाचताना दिसला. क्षणात मनावरील ताण हलका झाला. मन सकारात्मक विचारांनी भरून आले. कोरोनाने उद्भवलेली समस्या किरकोळ वाटायला लागली, आपण उगीच "पॅनिक'' झालो होतो, असा सुखद व वेगळा अनुभव दोंडाईचा येथील अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी "दै सकाळ" बोलताना कथन केला. 

दोंडाईचा येथे काल नऊ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. ही बातमी समजताच तहसीलदार श्री महाजन हे जागरूक झाले. त्यातच सिंधी कॉलनीतील एक रूग्ण नाशिकच्या "सह्याद्री हॉस्पिटल " मधून कोरोना 'पॉझिटिव्ह' आल्याची बातमी  कानावर आली. नवा रूग्ण असल्याने काँटॅक्ट ट्रेसिंग करणे अतिशय गरजेचे असल्याने श्री महाजन यांनी सिंधी कॉलनीकडे धाव घेत लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यातच दोंडाईचा शहरात वातावरणामुळे सर्वत्र अंधारून आले होते. गार हवा सुटली होती. मनात विचारांची दाटी झाली होती. शहराला वाचवून लोकांच्या मनातून भिती काढणे गरजेचे होते. कोणत्याही अफवा न पसरवता या प्रसंगी लोकांनी एकजुटीने संकटाला सामोरे कसे जावे. असे असंख्य विचार मनात गर्दी करून आले होते. थोडावेळ त्या "निर्मिका" शी अंतर्मन चर्चा करत होते. त्याच वेळी अचानक लोकवस्तीत रस्त्याच्या मधोमध एक मोर पिसारा फुलवून थुईथुई नाचताना दिसला. हे पाहून सर्व थकवा दूर झाला. मनावरील व नभातील मळभ दूर झाले. एका नवीन उभारीने व उमेदीने कामाला लागलो. अशा कामाला की ज्याचे सोल्युशन सापडल्याचे स्पष्ट जाणवत होते असे ही श्री महाजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT