(MP Unmesh Patil 
जळगाव

पाडळसरे धरणासाठी खासदार मंत्रालयासमोर आंदोलन करणार

धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे.

सकाळ वृत्तसेवा



अमळनेर : तालुक्याला नवसंजीवनी ठरू पाहणाऱ्या पाडळसरे धरणाच्या (Padalse Dam) कामाला गती मिळावी यासाठी जनआंदोलन समितीच्या सोबत मंत्रालयासमोर (Ministry) आंदोलन (Movement) करणार असल्याचा इशारा खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांनी दिला. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या बैठकीत बोलत असताना खासदारांनी पाडळसरे धरणाच्या पूर्तीसाठी राज्यशासनाने दिर्घ मुदतीचे कर्ज काढावे किंवा केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या पूर्ण करून तसा प्रस्ताव सादर करण्याचा मौलिक सल्ला दिला.


पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यालयात खासदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली.याप्रसंगी धरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांना धरणासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून घ्या असे साकडे घातले. यावेळी बोलतांना खा.उन्मेष पाटील यांनी धरणाच्या कामासाठी करीत असलेला पाठपुराव्याची माहिती उपस्थितांना दिली.तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक तो प्रस्ताव आणि आवश्यक त्या परवानगी पत्रांची पूर्तता तातडीने करावी किंवा ९ सप्टेंबर १०१९ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे यासाठी मंत्रालयात जाऊन धरण समितीसोबत आंदोलन करावे लागले तरी आंदोलन करू, असे खासदार पाटील यांनी सांगीतले.

जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी यावेळी धरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले तर रणजित शिंदे,अजयसिंग पाटील, सुनिल पाटील यांनी धरणाची किंमत दरवर्षी शेकडो कोटींनी वाढत आहे असे सांगितले. यावेळी प्रशांत भदाणे, महेश पाटील, समितीच्या कार्यकर्त्या वसुंधरा लांडगे, हेमंत भांडारकर, गोकुळ पाटील, रियाज मौलाना, यांचेसह भाजप चे ऍड.व्हि आर पाटील,महेश पाटील, उमेश वाल्हे,युवा कार्यकर्ते तुषार पाटील,राकेश पाटील आदिसह समितीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT