जळगाव

पिंगळवाड्याचा युवक पोहण्यासाठी गेला...आणि धरणाच्या भोवऱ्यात बुडाला! 

हिरालाल पाटील

कळमसरे  ता.अमळनेर ः पाडळसरे धरणाच्या पश्चिमेला तापी नदीच्या पात्रात तालूक्यातील पिंगळवाडे येथील दोन युवक मच्छी पकडण्यासाठी आले असता पोहण्यास गेला. खोल खदाणीत पाण्याच्या प्रवाहातील भोवऱ्यात एक बुडाला तर एक काठावर लागल्याने बचावला, नदीपात्रात मत्स्यव्यवसाय करणारे पाडळसरे येथील मच्छिमार यांच्या तीन तासांच्या परिश्रमाने त्याचा मृतदेह शोधून बाहेर काढला. ही घटना आज दुपारी २ वाजता घडली मयत युवकाचे नाव  कुंदन धर्मा दाभाडे (वय 22) असे आहे 

 पिंगळवाडे ता.अमळनेर येथील  कुंदन धर्मा दाभाडे व त्याचा बरोबर अमोल विनोद पारधी हे दोन्ही काका पुतणे दुपारी ११ वाजेच्या सुमारास पाडळसरे धरणावर तापी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी आले होते. कुंदनने पुतण्याला सांगितले की मी नदीत पोहून मासे पकडून आणतो म्हणून नदीत उतरला असता त्याचा पाय जोरात घसरून पाण्यात त्याचा तोल जाऊन तो पाण्याचा प्रवाहात वाहत जात असताना शेजारीच असलेल्या २० ते २५ फूट खोल खदाणीत भोवऱ्यात अडकल्याचे पाहून त्याचे सोबत असलेल्या पुतण्याने जोरजोरात आरडाओरडा केल्याने शेजारच्या धरणाच्या पाण्यात मच्छी पकडण्यासाठी नदीपात्रात असलेल्या पाडळसरे येथील पट्टीचे पोहणारे सुरेश कोळी,चंदा भिल, राजू कोळी,बापू भिल,राहूल भोई,ब्रिजलला भिल,भिकन कोळी,भिकन भोई यांच्या टीमने सलग तीन तासांचा अथक परिश्रमाने शोधून पाण्यातून बाहेर काढले.त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले, या ठिकाणी पिंगळवाडे येथील कुटुंबीय परिसरातील युवकांनी गर्दी केली होती, त्याचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी हलविण्यात आला, याबाबत अमोल विनोद दाभाडे राहणार पिंगळवडे यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT