जळगाव

अतिवृष्टीने बाधित २० गावांना दिलासा; शेतकऱ्यांसाठी पाच कोटींचे अनुदान 

उमेश काटे

अमळनेर : गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या २० गावातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी अनुदान प्राप्त झाले असून शासन दरबारी पाठपुराव्याचे हे पहिले यश आहे, याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपूर्ण ५२ गावातील बाधित शेतकऱ्यांना एकूण १२ कोटी अनुदान मिळून १०० टक्के न्याय मिळेल, अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.

आवश्य वाचा- कापुस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई 

अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुंधाटी, मुंगसे, मठगव्हान, नालखेडा, गंगापुरी, दापोरी खुर्द, खापरखेडा प्र.ज, पातोंडा, बोहरा, कळमसरे, धावडे, सावखेडा, निम, जळोद, पाडळसरे आदी १५ गावातील शेतकरी नियमित कर्जदार असल्याने त्यांना अनुदानाऐवजी जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. आता अनुदान प्राप्त झालेले २० गावातील शेतकरी जुलै २०१९ च्या अतिवृष्टीत बाधीत (नुकसानग्रस्त) झाले होते, तर सप्टेंबर २०१९ मध्ये ३२ गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते, महसूल विभागामार्फत एकूण 52 गावांचा नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, त्यानंतर या संपूर्ण ५२ गावातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार अनिल पाटील यांचे शासन दरबारी सतत प्रयत्न सुरू होते. 

कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ 

शासनाच्या निकषानुसार बिगर कर्जदार म्हणजेच ज्यांनी पीक कर्ज घेतले नसेल किंवा थकबाकीदार असतील, अशा शेतकऱ्यांचा अनुदानात समावेश असून त्यांना एक हेक्टरपर्यंत २० हजार ४०० याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असेल म्हणजे नियमित कर्जदार असतील त्यांना साहाय्यक निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत एक हेक्टरपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

जुलै २०१९ मधील अतिवृष्टीमुळे बाधित २० गावांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले असून सप्टेंबर २०१९ मध्ये बाधित झालेल्या ३० गावातील शेतकऱ्यांचे अनुदान अजून प्राप्त व्हायचे आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT