जळगाव

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा मिळाली मुदतवाढ

उमेश काटे

अमळनेर ः पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) साठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता शाळांना  दुसऱ्यांदा १० एप्रिल , २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या उपायुक्त शैलजा दराडे (पुणे) यांनी जारी केले आहे. 

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासून पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग बंदच आहेत. त्यामुळे यंदा पाचवी व आठवी या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होतील की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कारण दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच होत असे. मात्र उशिरा का असेना शिक्षण विभागाला जाग आली. यानुसार सुरुवातीला शिक्षण विभागातर्फे २५ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले होते, मात्र शासनाने या परीक्षेच्या वेळापत्रकात ही बदल करीत ही परीक्षा  २३ मे २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.  

१० एप्रिल पर्यंत मुदत वाढ

या परीक्षेच्या आवेदन पत्र भरण्याबाबत वेळोवेळी मुदतवाढही देण्यात येत असली तरी पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्यात यावर्षी योग्य मेळ साधला जात नसल्यामुळे पाहिजे तसा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यापूर्वीच या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता सुरुवातीला ९ मार्च ते २१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र यात पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे परीक्षा परिषदेतर्फे २१ मार्च ला पत्रक काढत ३० मार्च पर्यंत पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली होती. यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचा ईशारा ही देण्यात आला होता, मात्र पुन्हा परिषदेला आपली भूमिका बद्दलवीत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढवली. यानुसार आता १० एप्रिल २०२१ पर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्यापपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी १० एप्रिल २०२१ अखेरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, असे ही आवाहन राज्य परीक्षा परिषद तर्फे करण्यात आले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20I: कुलदीप यादव पुन्हा बाकावर बसणार ! इरफान पठाणने निवडली प्लेइंग इलेव्हन; ४ गोलंदाज, २ ऑलराऊंडर संघात

Nashik News : प्लास्टिक, कागद, पुठ्ठा खाक! नवीन नाशिकमधील भंगार दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार, मनपाच्या माजी बांधकाम सभापतींचा भाजपात प्रवेश

Yeola Farmer Protest : केंद्र सरकारच्या क्रूर चेष्टेचा निषेध! खतांच्या भरमसाट दरवाढीविरोधात छावा क्रांतिवीर सेनेचे येवल्यात आंदोलन

Mumbai News: अनिलकुमार पवार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ईडीची याचिका स्वीकारली

SCROLL FOR NEXT