mahastudent app
mahastudent app  
जळगाव

विद्यार्थ्यांची हजेरी आता ‘महास्टुडंट’ ॲपद्वारे

उमेश काटे

अमळनेर : राज्यातील सर्व शाळांमधील (Schools) विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती आता डिजिटल पद्धतीने महास्टुडंट ॲपद्वारे (Mahastudent App) भरून घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे (Department of School Education) सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. यामुळे शिक्षकांची विद्यार्थ्यांचे वेगळे हजेरीपत्रक व मध्यान्ह भोजनाची वेगळी माहिती भरण्याच्या कामातून सुटका होणार आहे.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षक आणि डिजिटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे. भारत सरकारने पीजीआय (Performance Grading Index) निर्देशांक विकसित केला आहे. यात शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थितीसाठी गुण आहेत. यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीत शाळांच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने महास्टुडंट ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता दिली आहे.

गुगल प्ले स्टोअरवर ॲप
शालेय शिक्षण विभागामार्फत महास्टुडंट ॲप विकसित केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲपमध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच्या आधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिकसरशी नोंदविता येणार आहे. यासोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ॲपमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही, यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन्ही ॲपचे एकत्रीकरण करण्यात येईल. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर एका क्लिकवर विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT